ॲपल कंपनीने (Apple Inc) आपल्या मॅकबुक एअर एम1 (Macbook Air M1) या लॅपटॉपसाठी खास एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) आणली आहे. आधीचा लॅपटॉप एक्सचेंज केलात तर नवीन मॅकबुक एअर M1 हा लॅपटॉपवर तुम्हाला 17,300 रुपयांची सूट (Discount) मिळणार आहे . आणि या सवलतीबरोबरच लॅपटॉप खरेदी करताना HDFC बँकेचं कार्ड वापरलंत तर तुम्हाला 10,000 रुपयांची अतिरिक्त सूटही मिळेल.
आणि त्यामुळे तुमच्या मॅकबुक एअर M1 वर तुम्हाला एकूण 27,300 रुपयांची एकूण सूट मिळू शकेल. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांचा जुना लॅपटॉप किंवा डेस्कटॉपही बरोबर आणावा लागेल. तुम्ही आणलेला लॅपटॉप आणि डेस्कटॉप पाहून तुम्हाला नेमकी किती सवलत मिळणार हे ठरवलं जाईल. ही ऑफर काही ठरावीक कंपनीचे लॅपटॉप आणि ठरावीक मॉडेलवरच उपलब्ध आहे. आणि तुम्हाला किती सवलत मिळेल हे तुमच्याकडे असलेल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या मॉडेलवरून ठरेल.
मॅकबुक एअर M1 हा लॅपटॉप कंपनीने 2020 मध्ये पहिल्यांदा बाजारात आणला. यात M सीरिजमधली चिप वापरली जाते. अलीकडेच ॲपल कंपनीने ही चिपसेट आणखी अद्ययावत करून M2 चिपसेट असलेले लॅपटॉपही बाजारात आणले आहेत.
फ्लिपकार्टवर मॅकबुक एअर M2 चिपसेट असलेले लॅपटॉपही उपलब्ध आहेत. आणि M2 सीरिजमधला 8GB रॅम तसंच 256GB स्टोरेज असलेल्या लॅपटॉपची किंमत आहे 1,13,990 रुपये. या लॅपटॉपवरही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डावर 10,000 रुपयांची सूट आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप एक्सचेंज केलात तर M2 सीरिजच्या लॅपटॉपवरही तुम्हाला 17,300 रुपयांची सवलत मिळू शकेल. आणि या दोन्ही सवलती धरता तुमचा मॅकबुक एअर M2 लॅपटॉप तुम्हाला 86,690 रुपयांना मिळेल.