आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी रविवारी जाहीर केले की, त्यांचा मुलगा रुचिर मोदी त्यांच्या जागी केके मोदी फॅमिली ट्रस्टच्या ललित कुमार मोदी (एलकेएम) शाखेचा प्रमुख म्हणून जागा घेईल. त्यांनी एलकेएम शाखेचे प्रमुख आणि केके मोदी फॅमिली ट्रस्टचे लाभार्थी म्हणून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
केके मोदी फॅमिली ट्रस्टच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात मोदींनी म्हटले आहे की, ते आणि त्यांची आई आणि बहीण बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत आणि तोडग्यासाठी अनेक वेळा बोलणीही झाली आहेत. या सगळ्याचा त्यांना खूप त्रास झाला आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा मुलगा रुचिर याचे नाव एलकेएम शाखेचा उत्तराधिकारी म्हणून पुढे केले आहे. तो याविषयीचे सर्व कामकाज हाताळणार आहे. ललित मोदी (Lalit Modi) यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोविड-19 ग्रस्त ते झाले आहेत. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. यानंतर ललित मोदी (Lalit Modi) यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कुटुंबातील रुचिरला आपला उत्तराधिकारी जाहीर केल्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की मोदी म्हणाले की, फॅमिली ट्रस्टमधील यापुढे कोणत्याही मालमत्तेत किंवा उत्पन्नात त्यांना रस असणार नाही. मात्र, ते KKMFT चे विश्वस्त म्हणून कायम राहणार आहेत.
पत्रात आणखी काय म्हणाले Lalit Modi
केके मोदी फॅमिली ट्रस्टच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात आणखीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. ‘ माझी दोन्ही मुले समान आहेत. सारखीच लाभार्थी आहेत पण नेता एकच असू शकतो. माझी मुलगी खूप हुशार आहे, पण तिला ही भूमिका नको आहे. एकदा अध्यक्षांच्या सूचनेवरून त्यांना कार्यालयातून बाहेर काढून कुलूप लावण्यात आले. दुसऱ्यांदा जेवणासाठी बाहेर असताना तिची गाडी काढली. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेले वैमनस्य ती सांभाळू शकत नाही.’ याचबरोबर ते असंही म्हणाले की, मला माझ्या वडिलांची चूक मला पुन्हा करायची नाही. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की मला खूप आनंद होत आहे, वयाच्या 59 व्या वर्षी ही योग्य वेळ आहे, पण माझ्या वडिलांकडे पुढच्या पिढीसाठी हे करायला वेळ नव्हता. मला ती मोठी चूक पुन्हा करायची नाही.
केके मोदी फॅमिली ट्रस्टवरून ललित मोदी, त्याची आई बिना मोदी आणि बहीण यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर न्यायालयाने तोडगा काढला होता. 2022 मध्ये ललित मोदींच्यावतीने प्रसिद्ध वकील हरीश साळवे आणि त्यांच्या आईच्या वतीने कपिल सिब्बल यांच्यासह इतर वकिलांनी समझोता केला. परंतु कोणताही तोडगा निघू शकला नाही.
ट्रस्ट मालमत्ता विकण्यावरून वाद
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये ललित मोदींचे वडील केके मोदी यांच्या निधनानंतर कुटुंबात भांडणे वाढली होती. केके मोदी फॅमिली ट्रस्टच्या मालमत्तेचा हा वाद आहे. संपत्तीच्या विक्रीबाबत ट्रस्टच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याचा दावा मोदींनी न्यायालयात केला. तरीही मालमत्तेची विक्री सुरू झाली आणि त्याचा समान हिस्सा वर्षभरात ट्रस्टच्या सदस्यांना दिला गेला नाही. तर ललितची आई बीना मोदी यांचा दावा आहे की ट्रस्टची कोणतीही मालमत्ता विकली गेली नाही.