Auto Expo 2023: ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक कार लॉंच केल्या आहेत, त्यापैकी एक टाटा टियागो ईव्ही ब्लिट्झ आहे. कंपनीने अजून Tata EV Blitz ची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनीच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक असू शकते जी कंपनी 8 ते 9 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया फीचर्स आणि कधी होणार लॉंच?
Tiago EV Blitz चे फीचर्स (Features of Tiago EV Blitz)
या इलेक्ट्रिक Tiago EV Blitz च्या पॉवरट्रेनची माहिती अजून Tata Motors ने सार्वजनिक केलेली नाही, कंपनीने Tata Tiago EV मध्ये जी पॉवरट्रेन दिली आहे तीच पॉवरट्रेन यामध्ये सापडू शकते. Tata Tiago EV मध्ये दोन बॅटरी पॅकचा पर्याय आहे. त्यातील पहिला बॅटरी पॅक 19.2 kWh क्षमतेचा आहे जो 61 PS कमाल पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क जनरेट करतो. दुसरा बॅटरी पॅक 24 kWh क्षमतेचा आहे जो 75 PS कमाल पॉवर आणि 114 Nm पीक टॉर्क जनरेट करतो.
Tata Tiago EV चा दावा आहे की पहिल्या बॅटरी पॅक 19.2 kWh सह 250 किमी आणि दुसरा बॅटरी पॅक 24 kWh सह 315 किमी आहे. स्पीडबाबत कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक हॅचबॅक पहिल्या बॅटरी पॅकवर 6.2 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग मिळवू शकते. Tata Tiago EV Blitz ला देखील समान कॅटेगरी आणि उच्च गती मिळण्याची अपेक्षा आहे.
Tiago EV Blitz कधी लाँच होईल? (When will Tiago EV Blitz be launched?)
टाटा ब्लिट्झच्या लॉन्च डेटबाबत टाटा मोटर्सकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण कंपनीच्या रिपोर्ट्सनुसार, डिसेंबर 2023 मध्ये लॉन्च करू शकते.