NRE FD Rates 2023: भारतीय लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात स्थलांतरित होतात. कायदेशीररित्या परदेशात कमावणारे भारतीय लोक सामान्य बचत खात्यातून आर्थिक व्यवहार करू शकत नाहीत. त्यामुळे बँकांनी त्यांना एनआरओ (NRO) आणि एनआरई (NRE) अशा दोन विशेष खात्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच एनआरई खात्यावरील एफडीच्या व्याजदरात 2023 या वर्षात वाढ करण्यात आली आहे. नेमकी कोणती बँक किती व्याजदर देते, हे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
एनआरई एफडी रेट (NRE FD Rates)
एनआरई खात्यात बचत (Saving Account), चालू (Current Account) आणि मुदत ठेवी (FD) या सुविधा दिल्या जातात. यामध्ये मिळणारे व्याजदर हे प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असतात. 2023 या वर्षातील वेगवेगळ्या बँकांचे एनआरई खात्यावरील एफडीचे नवे व्याजदर जाणून घेऊयात.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
आयसीआयसीआय या प्रायव्हेट बँकेने एनआरई (NRE) खात्यावरील एफडीचे व्याजदर 24 फेब्रुवारी 2023 पासून वाढवले आहेत. त्यानुसार नवे व्याजदर हे 6.70 टक्के ते 7.10 टक्क्यांच्या दरम्यान आहेत.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
HDFC बँकेने एनआरई खात्यावरील एफडीचे व्याजदर 21 फेब्रुवारी 2023 पासून वाढवले आहेत. या नव्या व्याजदराप्रमाणे खातेधारकांना दोन कोटींपेक्षा कमी रकमेसाठी 6.60 टक्के ते 7.10 टक्के व्याज दिले जात आहे. तर दोन कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी 7.10 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर दिला जात आहे.
एसबीआय बँक (SBI Bank)
देशातील सर्वात मोठी बॅंक, स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील 15 फेब्रुवारी 2023 पासून एनआरई खात्यावरील एफडीवर नवीन व्याजदर लागू केले आहेत. या नव्या व्याजदरानुसार एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून दोन कोटींपेक्षा कमी रकमेवर 6.50 टक्के ते 7.10 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर दोन कोटींहून अधिक रकमेवर 6 टक्के ते 6.75 टक्के व्याज बँक देत आहे.
पीएनबी बँक (PNB Bank)
पंजाब नॅशनल बँकेने एनआरई खात्याच्या एफडी दरात वाढ केली आहे. मागील वर्षी बँकेने 5.6 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर दिला होता. आता 1 जानेवारी 2023 पासून पीएनबी बँकेने नवे व्याजदर लागू केले आहेत. नवीन दरानुसार एनआरई खातेधारकांना 6.5 टक्क्यांवरून 7.25 टक्के व्याजदर दिला जात आहे.
कॅनरा बँक (Canara Bank)
कॅनरा बँकेचे नवे व्याजदर हे 5 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी बँकेने 6.70 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर दिला आहे.
Source: abplive.com