Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fixed Deposit Interest Rate: मुदत ठेवीवर बँकाचे 'हे' आहेत व्याजदर

Income Tax

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा निर्देशांक वाढला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2022 मध्ये रेपो दरात 5 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले ​​आहेत. बदललेले बँकांचे व्याजदर जाणून घ्या.

जर तुम्ही चांगल्या परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) मध्ये गुंतवणूक करणे अनेक लोक पंसत करतात. FD वर 7% पेक्षा जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेची माहिती आम्ही देत येथे देत आहोत.

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)

तुमची पंजाब नॅशनल बँकेत एफडी सुरु करण्याचा विचार करत असाल तर तो एक चांगला निर्णय ठरू शकतो. ही बँक ग्राहकांना 666 दिवसांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने या बँकेने आपल्या एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक म्हणून बँक ऑफ बडोदा ओळखली जाते. ही बँक देखील सध्या एफडीवर चांगला व्याजदर देत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना Tricolor Plus FD योजनेत 399 दिवसांच्या FD वर 7.05 टक्के व्याजदर देत आहे. सर्वसामान्य नागरिक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

कॅनरा बँक (Canara Bank)

कॅनरा बँक ही भारत सरकारची मालकी असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक महत्वाची बँक आहे. ही बँक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.25% ते 6.50% पर्यंत व्याजदर देत आहे. कॅनरा बँक 666 दिवसांच्या FD वर 7.00% इतका व्याजदर देते आहे.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

ICICI बँक ही भारतातील आघाडीची बँकिंग आणि वित्तीय सेवा देणारी बँक आहे. ही बँक 15 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 7.00 टक्के व्याजदर देत आहे. सामान्य नागरिकांना 2 कोटींपेक्षा कमी किमतीच्या FD वर  7.00 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे .

एक्सिस बँक (Axis Bank)

एक्सिस बँक ही भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी बँक आहे. ते आपल्या ग्राहकांना  2 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 7.00 टक्क्यांपर्यंत व्याजदर देखील देत आहे.