What is TCS Company Famous For: टाटा कंपनी (Tata Company) हा ब्रॅंड तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनातील सर्वात्तम घटक बनला आहे. टाटा हा एक खूप मोठा ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. टाटाने जवळजवळ सर्वच क्षेत्रात उडी मारली आहे असून हा ब्रॅंड त्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठया कंपनींमध्ये टाटाने दुसऱ्या क्रमांक मिळविला आहे. या कंपनीची घौडदौड पाहूयात.
टाटा कंपनीची सुरूवात (Beginning of Tata Company)
टाटा कंपनीची सुरूवात साधारण 1962 साली 50 लाखापासून करण्यात आली होती. ही कंपनी पहिली ग्राहक टिस्को टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष जेआरडी टाटा व त्यांचे मेहुणे सहकारी लेस्लाई साहनी यांनी एकत्रित येऊन आयटी सुविंधासाठी या कंपनीची स्थापना केली. सुरूवातीला या कंपनीत एमआटीमधून काही कर्मचारी घेतले. या कंपनीचे पहिले क्लायंट ही टिस्को स्टील कंपनी (Tisco Steel Company) होती. या कंपनीसाठी टाटाने पंचकार्ड तयार केले होते. नंतर टिस्को ही कंपनी टाटाचा भाग बनली. पूर्वी या कंपनीला टाटा इन्स्टिटयूट आफ सोशल सायन्सेस म्हणून ओळखले जात होते, यानंतर 1966 मध्ये कंपनीचे नाव बदलून टाटा सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) हे नाव देण्यात आले.
टाटा किती व कोणत्या क्षेत्रात कार्यरत (How much & in which sector)
सध्या टीसीएस हा ब्रॅंड 15 पेक्षा अधिक औदयोगिक क्षेत्रात कार्यरत आहे. यामध्ये बँकिंग, शिक्षण, भांडवली बाजार, कम्युनिकेशन-मीडिया आणि माहिती सेवा, शिक्षण, आरोग्यसेवा, विमा, उत्पादन, किरकोळ, ग्राहकोपयोगी वस्तू आणि वितरण, ऊर्जा संसाधने, उच्च तंत्रज्ञान, जीवन विज्ञान, सार्वजनिक सेवा, प्रवास आणि लॉजिस्टिक्स आहेत. याव्यतिरिक्त इतर अनेक व्हर्टिकल्सचादेखील समावेश आहे. या कंपनीने सुरूवातीला म्हणजे साठच्या दशकात अमेरिकेवर फोकस केले होते. त्यामुळेच आता ही या कंपनीचा अधिक महसूह हा अमेरिकेतूनच वसूल होतो.
जगभरात किती देशात काम करते (How many Countries does it work in)
जगभरात टीसीएस ही कंपनी 153 देशांत काम करते. जागतिक पातळीवर ही कंपनी पहिल्या क्रमाकांवर आहे. या कंपनीचे 40 पेक्षा अधिक संशोधन व इनोव्हेशन सेंटर्स आहेत. जगभरातून या कंपनीत साधारण 5,92,195 कर्मचारी काम करतात. तसेच या कर्मचाऱ्यांमध्ये 35% पेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे. या कंपनीसाठी सर्वाधिक महसूल 52.2% हा अमेरिकेतून प्राप्त होतो. तसेच या ब्रॅंडची सर्वाधिक म्हणजे 39.2% कमाई बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा या क्षेत्रातून होते.