• 07 Dec, 2022 09:05

Mutual Fund Myths and Fact : म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयीचे हे 8 गैरसमज दूर करा

Mutual Fund Investment, MF Investment, Share Market, Portfolio

Mutual Fund Myths and Fact: गुंतवणुकीचा विचार करताना काही पैसे मुच्युअल फंडांमध्ये गुंतवावे असा सल्ला दिला जातो. पण गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीविषयी अनेक गैरसमज (Mutual Fund's Myths) आहेत. Mutual Fund's Myths कोणती? यातली वस्तुस्थिती (Fact's of Mutual Fund's) काय आहे ते जाणून घेऊया.

म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे. मात्र Mutual Fund's Myths दूर करून Fact's जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही प्रभावीपणे म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सक्षम व्हाल. गुंतवणुकीचा विचार करताना काही पैसे मुच्युअल फंडांमध्ये गुंतवावे, असा सल्ला सर्रास दिला जातो. पण गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीविषयी अनेक गैरसमज (mutual fund myths) आहेत. mutual fund's myths कोणती? यातली वस्तुस्थिती (facts on mutual funds) काय आहे ते  जाणून घेऊया. 

दीर्घ कालावधीसाठीच मुच्युअल फंड घ्यावे लागतात (MF For Long Term Only)

म्युच्युअल फंड्स दीर्घ कालावधीसाठी घ्यावेत, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतातात. त्याची वेगवेगळी कारण आहेत. पण ते  बंधनकारक (कम्पलसरी) नाही. अचानक काही आर्थिक अडचण उद्भवल्यास तुम्ही अगदी 1 वर्षांनंतरही तुमची मुच्युअल फंड्समधील गुंतवणूक काढून घेऊ शकता. तशी सुविधा या गुंतवणूक योजनांमध्ये असते.

वेगवेगळे म्युच्युअल फंड्स निवडले तर पोर्टफोलिओत वैविध्यता येते (Different MF will make portfolio diversified)

आपल्या गुंतवणुकीत वैविध्यता आणण्यासाठी आपल्याला अनेक योजना निवडायची गरज नाही.आपण ज्या मुच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतो तेथील फंड मॅनेजर इक्वीटी, बॉण्ड्स अशा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या पैशांची विभागणी करत असतो. पोर्टफोलिओत वैविध्यता असावी या दृष्टीने बहुतांश योजनांची रचना केलेली असते. 

टॉप रेटेड म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा (Top Rated Fund will give more return's)

हा सुद्धा एक म्युच्युअल फंडांच्याबाबतीत एक मोठा गैरसमज (Mutual Fund Myth) आहे. एखादा ट्रिपल रेटेड फंड जरी असेल तरी बाजारात घसरण झाली तर या उच्च मानांकित फंडाच्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो.हा फंड प्रसंगी कमी परतावाही देऊ शकतो. त्यामुळे आपल्यासमोर असणाऱ्या फंड योजनेची कामगिरी आणि परताव्याचा इतिहास तपासून बघणे महत्वाचे आहे.ॉ

डिमॅट अकाउंट उघडावेच लागते (Demat  Must for MF Investment)

या प्रकारात गुंतवणूक करताना डिमॅट अकाउंट उघडावेच लागते, असे नाही. आपण अॅप्लिकेशन फॉर्म, संबंधित कागदपत्रे वगैरे जमा करुन यात गुंतवणूक करू शकता. अर्थात, आपण जेव्हा एखाद्या ऍपच्या माध्यमातून ही गुंतवणूक करतो तेव्हा त्या प्रक्रियेत (प्रोसेस) डिमॅट अकाउंट उघडले जातेच. काही योजनांमध्ये डिमॅटची आवश्यकता नाही.

मुच्युअल फंड्समध्ये खूप जास्त गुंतवणूक करावी लागते (Huge Investment Required in MF)

काही जणांच्या मनात हा एक सर्वसाधारण गैरसमज आहे की म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक करावी लागते. पण मुच्युअल फंड्समधील वस्तुस्थिती अशी नाही. तुम्ही अगदी SIP द्वारे दरमहा केवळ 500 रुपयांची गुंतवणूक करु शकता.

तरुण वयात गुंतवणूक करण्यासाठी हा पर्याय योग्य नाही

असे बऱ्याच जणांना वाटते. पण तारुण्यातच गुंतवणुकीची सुरुवात करताना हा पर्याय चांगला आहे, असे अनेक गुंतवणूक सल्लागार सांगतात. याचे एक कारण म्हणजे, सुरुवातीला बाजाराचा सखोल अभ्यास स्वतःला करावा लागत नाही. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तुमचे वय. यामुळे सुरुवातीला आपला फंड चांगली कामागिरी करत नसला तरी तुमचे वय कमी असल्याने असल्यामुळे दीर्घ कालावधीसाठी (लॉन्ग टर्म) यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते.

NAV जास्त असेल तर जास्त परतावा (Higher NAV Higher Return's)

NAV म्हणजे net asset value ही त्या दिवसाची किंमत असते. भविष्यात बाजाराने चांगली कामागिरी केली नाही तर nav खाली येऊ शकते. हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे NAV जास्त म्हणजे त्या योजनेकडून परतावा जास्त मिळतो असे मानणे चुकीचे आहे. कोणतीही योजना तुम्हाला निश्चित ठरवून परतावा देऊ शकत नाही.

मुच्युअल फंडमध्ये हमखास चांगले रिटर्न्स मिळतात (MF Gives Guaranteed Return's)

 म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीतून हमखास परतावा मिळतो, असा समज सर्वात घातक आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे ही या गुंतवणूक योजनेतही जोखीम आहे. फंड मॅनेजर तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणण्याचा प्रयत्न करतो.तसेच बॉण्डमधील गुंतवणूक ही यातून होते. यासारख्या कारणांमुळे यातील जोखिम मर्यादित करता येते.पण मुच्युअल फंड्स म्हणजे गॅरंटेड रिटर्न्स मिळतात, हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.