Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नवीन गुंतवणूकदारांसाठी SIP चांगली आहे का?

SIP is good for new investor

Systematic Investment Plan-SIP म्हणजे काय? आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा तो एक प्रभावी मार्ग का ठरत आहे? याबाबत अधिक जाणून घेऊ.

गेल्या 5 वर्षांत शेअर मार्केटमध्ये सहभागी होणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे बहुसंख्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. हे गुंतवणूकदार सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे गुंतवणूक करण्यास पसंती देत आहेत आणि ही पद्धती गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय आणि प्रभावी ठरली आहे.

एसआयपी गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम पर्याय का आहे?

एसआयपी गुंतवणुकीत आणि बचतीमध्ये शिस्त आणते!

अनेक जण पैसे वाचवता येत नाहीत; म्हणून सतत तक्रार करत असतात. पण एसआयपीमुळे अनेकांच्या अशा तक्रारी बंद होण्यास मदत झाली. कारण एसआयपीमुळे गुंतवणूकदाराला दर महिन्याला नियमित तारखेला गुंतवणूक करायची सवय लागते आणि यासाठी त्याला काहीच विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच ही गुंतवणूक अत्यंत कमीतकमी पैशात करता येते.

लहान रकमेसह गुंतवणुकीस प्रारंभ!

SIP तुम्हाला दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सुविधा देते. तुमचे उत्पन्नाचे साधन भरपूर नसेल किंवा तुमचे बचत कमी असली तर तुम्ही SIP ने विविध म्युच्युअल फंडमधील स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. 

शेअर मार्केटच्या वेळेचा ताण घेण्याची गरज नाही

SIPमध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तुम्हाला मार्केटच्या वेळेनुसार गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. SIPद्वारे तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कोणतीही वेळ, स्थिती किंवा मार्केटमध्ये होणारी तेजी किंवा घसरण पाहण्याची गरज नाही. एसआयपी त्याचे काम त्याच्या पद्धतीनुसार करत असते. यासाठी तुम्हाला फक्त त्याच्या परवानग्या द्याव्या लागतात.

कंपाउंडिंगचा फायदा घ्या!

जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा एसआयपीमधून मिळणारा मासिक परतावा मुदतपूर्तीपर्यंत तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेत पुन्हा गुंतवला जातो. त्यामुळे तुमची गुंतवणुकीची रक्कम चक्रवाढव्याजाने वाढत जाते आणि तुम्हाला त्यातून आश्चर्यकारक परतावा मिळतो.

तुमच्या सोयीनुसार SIP स्टॉप करा!

तुम्हाला जर एसआयपी थांबवायची असेल तर तुम्ही लगेच ती स्टॉप करू शकता. यासाठी तुमच्याककडून कोणताही दंड आकारला जात नाही. तुम्हाला फक्त एसआयपी स्टॉप करण्याचे निर्देश द्यावे लागतात. त्यानुसार 2-3 कार्यालयीन दिवसांत तुमची एसआयपी स्टॉप होते.


खात्यात पैसे नसले तरी दंड लागत नाही

अनेक एसआयपीसाठी पुरेसे पैसे बॅंकेत नसतात. अशावेळी तुम्ही घाबरून किंवा दंड आकारला जाईल म्हणून एसआयपी बंद करू नका. कारण एखाद्या महिन्यात एसआयपी बॅंकेतून गेली नाही तरी कोणताही दंड म्युच्युअल फंड कंपनीकडून आकारला जात नाही. पण यामुळे आपलेच नुकसान होते. त्यामुळे एसआयपी कट होण्याच्या तारखेला खात्यात पैसे आहेत की नाही याची खात्री गुंतवणुकादारांनी करणे गरजेचे आहे.

पगार वाढला, बोनस मिळाला, आणखी एक SIP सुरू करा!

जर तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळाली असेल, बोनस मिळाला असेल किंवा इतर कामाचे तुम्हाला चांगले पैसे मिळत असतील तर लगेच आणखी एक एसआयपी सुरू करा. वेगवेगळ्या फंडमध्ये पैसे गुंतवून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण बनवू शकता. ज्यामुळे तुमची जोखीम आणखी कमी होण्यास मदत होईल.

गुंतवणूक आणि भावना यांची सांगड घालण्यास मदत

शेअर मार्केटमध्ये होत असलेल्या चढ-उतारामुळे तिथे भावनेच्या भरात किंवा मार्केटच्या स्थितीनुसार निर्णय घेतले जातात. पण एसआयपीमुळे या दोन्हीमध्ये शिस्त आणण्यात मदत होते. इथे गुंतवणूक आणि भावना यांची सांगड घालून योग्य निर्णय घेण्याची शिस्त लागते.

10 ते 15 वर्षांपूर्वी ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे; त्यांना आता चांगले रिटर्न्स मिळत आहेत. चला तर काही उदाहरणांमधून हे समजून घेऊ. समजा तुम्ही वर्ष 2000 मध्ये HDFC Top 200 मध्ये प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपयांची SIP केली असेल. म्हणजे 22 वर्षाच्या कालावधीत तुम्ही सुमारे 8 लाख रुपये गुंतवले असतील तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य किमान 40 लाख इतके असेल.

म्युच्युअल फंडद्वारे भारतात इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वांत सुरक्षित आणि सोयीचा मार्ग म्हणून एसआयपीकडे पाहिले जाते. हा पर्याय निवडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.