तुम्हाला तातडीने पैशांची गरज लागली तर तुमची कार मदतीला येऊ शकते? कारच्या बदल्यात बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवता येते. या प्रकारचे कर्ज सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत येते. कारसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया जलद आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कार एमर्जन्सीच्या काळात वापरण्यासाठी एक आदर्श पर्याय आहे. कारवरील कर्जाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी येथे शेअर केल्या आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
कारवर किती कर्ज मिळू शकेल? (How Much Loan Approved Against Car)
कारसाठी जारी केलेल्या कर्जाची रक्कम त्याच्या मूल्याच्या 50% ते 150% असू शकते. कारवरील कर्ज फेडीचा कालावधी साधारणपणे 12 महिने ते 84 महिन्यांपर्यंत असू शकतो. काही प्रकरणांमध्ये, कर्जाचा कालावधी देखील वाढू शकतो. वैयक्तिक कर्जाप्रमाणे, हे कर्ज कोणतेही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खर्च केले जाऊ शकते.
कारवरील कर्जासाठी अर्ज कसा करावा? (How to Apply for a Loan Against your Car?)
सध्या अशा अनेक वित्तीय संस्था आहेत ज्या कारवर कर्ज देतात. या संस्था ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे कर्जाचा अर्ज स्वीकारतात. कारवर कर्ज देणार्या बँका शोधा. या बँकांकडून कार कर्जाच्या अटी आणि नियमांबद्दल जाणून घ्या. मग तुम्ही कार कर्जासाठी सर्वोत्तम अटी आणि शर्ती देणाऱ्या बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घ्या. कारवर कर्ज घेण्याच्या बाबतीत, BankBazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी सुचवतात की अशा कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असू शकतात हे जाणून घेण्यासाठी कार मालकाने बँकेच्या वेबसाइटला भेट द्यावी. अशा बँकेत किंवा वित्तीय संस्थेत अर्ज करा जिथून तुम्ही आधी कर्ज घेतले आहे किंवा तुमचे वेतन बँक खाते उघडले आहे. कारण त्या बँकेकडे तुमचे सर्व रेकॉर्ड आधीच असतात. स्वतःला एकाच बँकेपुरते मर्यादित ठेवू नका. तुम्ही कारवर चांगले कर्ज देणार्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे देखील अर्ज करू शकता.
कारचे मूल्य कसे निश्चित केले जाते? (How Car Valuation Determine)
अशी कर्जे देणार्या काही बँका किंवा वित्तीय संस्था कारचे मूल्यमापन आणि पडताळणी करण्याबाबत खूप काळजी घेतात. प्री-अप्रुव्ह ऑफरच्याबाबतीत, कर्ज देणारी बँक किंवा वित्तीय संस्था कारवर कर्ज देण्यापूर्वी वाहनाचे मूलभूत मूल्यांकन आणि पडताळणी करू शकते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कारवर घेतलेल्या कर्जाची रक्कम ईएमआय अर्थात मासिक हप्त्याच्या स्वरूपात वेळेवर परत करू शकता. हे कर्ज कोणत्याही कारणाने चुकले तरी, बँक किंवा वित्तीय संस्थेला कार जप्त करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.