Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Loan घेताय मग ‘या’ खास गोष्टी नक्की चेक करा!

Car Loan Check List

Car Loan : कोणत्याही फायनान्शिअल कंपनी किंवा बॅंकेकडून कार लोन घेण्यापूर्वी तुमचे बजेट किती आहे; तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे? आणि तुम्हाला किती रुपयांचा हप्ता भरणे सोयिस्कर ठरू शकते, अशा अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

अनेक कार शोरूमस् गाड्यांचा नवीन स्टॉक येण्यापूर्वी ग्राहकांना वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देतात. म्हणूनच, सणासुदीचा काळ आणि वर्षाचा शेवट हा काळ नवीन कार खरेदी करण्यासाठी उत्तम समजला जातो. सध्या गाड्यांची विक्री वाढू लागली आहे आणि बँकांच्या कार लोन (Car Loan) पोर्टफोलिओमध्येही सुधारणा होऊ लागल्या आहेत. बऱ्याच जणांना त्यांच्या पसंतीची कार खरेदी करण्यासाठी कार लोनची गरज भासते. अशावेळी तोटा टाळून सहज कर्ज घ्यायचे असेल तर कार लोनशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत आणि अर्ज करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती जाणून घेऊया.

बजेट ठरवा (Set your budget)

तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आहे; हे ठरवून बजेटचा विचार करा. कार खरेदी करण्यापूर्वी कार विमा (Car Insurance), पेट्रोल-डिझेलचा खर्च, दुरुस्ती खर्च, तसेच सोयीनुसार कार सुशोभित करण्याचा खर्च लक्षात ठेऊन लोनचे बजेट फिक्स करा.

क्रेडिट स्कोअर तपासा (Check your Credit Score)

कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) असणे आवश्यक आहे. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा चांगला क्रेडिट स्कोअर हे ठरवतो की कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीला एकदा ते वितरित केल्यानंतर पैसे गमावण्याचा धोका कमी असतो. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे कमी वेळात कार लोन मिळू शकते. क्रेडिट कार्डची थकबाकी आणि इतर कर्जांची वेळेवर परतफेड केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये भर पडते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे गरजेचे आहे.

मासिक उत्पन्न (Monthly Income)

कर्जदाराचे  मासिक उत्पन्न चांगले असेल तर कर्जाची रक्कम परत करण्यात त्याला कोणतीही अडचण येत नाही. कर्जदाराने  वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था (Finance Company) कर्ज वितरित करण्याचा प्रक्रिया अधिक सुलभ करू शकतात. कर्ज घेतल्यानंतर येणारा आर्थिक भार टाळण्यासाठी उत्पन्न आणि परतफेड क्षमतेनुसार कर्जाची रक्कम निवडणे आवश्यक आहे.

कर्जाची रक्कम ठरवा (Decide Loan Amount)

परतफेडीच्या समस्या टाळण्यासाठी कर्जाची रक्कम निवडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कर्जाची रक्कम जितकी जास्त असेल तितकी मासिक हप्त्याची परतफेड रक्कम जास्त असेल. त्यामुळे जास्त हप्त्याची रक्कम न भरण्यासाठी कर्जाचा कालावधी वाढवणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही प्रत्येक महिन्याला तितका ईएमआय (EMI) भरण्यास सक्षम असाल तेवढेच कर्ज शक्यतो घेणे उचित ठरू शकते.

परतफेडीचा कालावधी (Repayment Duration)

कोणतेही कर्ज घेताना त्यातील परतफेडीचा कालावधी (Loan Repayment Duration) खूप महत्त्वाचा आहे. रक्कम उभारण्यासाठी दीर्घकालीन कर्जाची निवड केल्यास परतफेड करताना मासिक हप्ता (EMI) कमी असेल तर या कर्जावर जास्त व्याज भरावे लागते. अल्प मुदतीचे कर्ज निवडल्यास मासिक हप्त्याची रक्कम अधिक भरावी लागते. अशा स्थितीत कर्जाची परतफेड लवकर करावी लागते. कमी कालावधीसाठी कार लोनची निवड केल्यास, कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था (Finance Company) त्यावर कमी व्याजदर देतात. कर्जदारांनी EMI लक्षात ठेवून कमी मुदतीची निवड करावी. कालावधी कमी असेल तर EMI जास्त असतो. त्यामुळे व्याज कमी जाते. अशारीतीने अल्प कालावधीमुळे कर्ज लवकर फेडता येते.

ग्राहक सेवा (Customer Service)

कर्ज घेताना ग्राहक सेवा कशी पुरवली जाते याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कार लोनची प्रक्रिया पूर्ण करताना  एक कर्जदार म्हणून, तुम्हाला वेळोवेळी कर्ज घेण्याची प्रक्रिया माहित असणे गरजेचे आहे. कार लोनच्या संपूर्ण कालावधीत तुम्हाला काही शंका असतील, तर त्या कर्ज देणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधी बोलून लगेच त्याचे निरसन करणे आवश्यक आहे. तसेच लोन घेण्यापूर्वी तुमच्या उपलब्ध असलेली कागदपत्रे, बॅंक आणि कंपनीद्वारे पुरवली जाणारी सेवासुविधा काय आहेत, हे तपासून घेतले पाहिजे.

व्याजदर आणि ईएमआय (Rate of Interest & EMI)

कोणत्याही फायनान्सशिअल कंपन्या किंवा बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी त्यांचे व्याजदर आणि त्यावर मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा तपासून घेणे महत्त्वाचे आहे. बॅंकेच्या ईएमआयच्या आकडेवारीची आणि व्याजदराची तुलना करून कार लोन घेण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.