Jio Recharge Plan: जिओच्या ग्राहकांना नेहमी नवनवीन ऑफर्स मिळत असतात. ग्राहकांना जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक योजना मिळतात. जर तुम्हाला दीर्घकालीन कॉलिंग प्लॅन हवा असेल तर तुमच्याकडे खूप कमी पर्याय आहेत. जे पर्याय आहेत त्यांच्यासाठीही सुमारे तीन हजार रुपये खर्च करावे लागतात. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अतिशय स्वस्त योजना आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिन्ही प्रकारच्या सुविधा मिळतात. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना अतिरिक्त फायदे म्हणून जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते, जाणून घेऊया डिटेल्स.
1559 रुपये खर्च करून मिळवा वर्षभराच्या जवळपास व्हॅलिडिटी….. (Spend Rs 1559 and get almost a year validity…..)
1559 रुपये खर्च करून घेतलेल्या जिओच्या या प्लॅन मध्ये ग्राहकांना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 24GB डेटा पूर्ण व्हॅलिडिटीसाठी आहे. डेटा व्हॅलिडिटी संपल्यानंतर, तुम्हाला 64Kbps स्पीडने इंटरनेट मिळत राहील. तुम्ही डेटा व्हाउचर खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह, ग्राहकांना 3600 एसएमएसचाही लाभ मिळतो.
यूजर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चा अॅक्सेस….. (Users have access to Jio TV, Jio Cinema, Jio Security and Jio Cloud….)
एवढेच नाही तर ग्राहक 5G डेटा वापरण्यासही पात्र असतील. तुमच्या शहरात Jio 5G सेवा असल्यास आणि तुमच्याकडे 5G हँडसेट असल्यास, तुम्ही Jio 5G सेवेचा लाभ घेऊ शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे जिओ वेलकम ऑफर असणे आवश्यक आहे. यामध्ये यूजर्सना Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चा अॅक्सेस मिळेल.
Jio वेलकम ऑफर (Jio Welcome Offer)
Jio वेलकम ऑफर कंपनीने निवडक ग्राहकांना दिली आहे आणि ती एक invitation आधारित ऑफर आहे. याशिवाय इतर पर्याय देखील आहेत, याशिवाय Jio च्या स्वस्त प्लॅन्सच्या यादीत 395 आणि 155 चे रिचार्ज देखील आहे. या दोनमध्ये, वापरकर्त्यांना अनुक्रमे 84 दिवस आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. 395 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 6GB डेटा मिळेल. त्याच वेळी, 155 रुपयांमध्ये, कंपनी पूर्ण व्हॅलिडिटीसाठी 2GB डेटा देत आहे.