Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जेट एअरवेज सप्टेंबरमध्ये पुन्हा उड्डाण घेणार; कंपनीचे शेअर्सही सुसाट!

jet airways

Jet Airways back : हवाई वाहतूक संचालनालयाने (Directorate General of Civil Aviation – DGCA) परवानगी दिल्यामुळे भारताच्या जेट एअरवेजची (Jet Airways) विमान सेवा सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा सुरु होणार आहे.

गेल्या 3 वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात अडकलेली जेट एअरवेज कंपनीची विमानं (Jet Airways Airline) सप्टेंबरपासून पुन्हा एकदा आकाशात उड्डाण घेणार आहेत. जेट एअरवेजची विमानसेवा 3 वर्षांपासून बंद होती. हवाई वाहतूक संचालनालयाने जेट एअरवेजला परवानगी दिल्याने लवकरच याची विमानसेवा सुरू होणार आहे.

जेट एअरवेज कंपनीला मागील काही वर्षांत मोठा तोटा सहन करावा लागला होता. या वाढत्या तोट्यामुळे कंपनीची विमान सेवा बंद पडली होती. कंपनीचे दुबईस्थित नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर कंपनीची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. जलान यांनी हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या मिळवल्या असून आता लवकरच कंपनीची विमानसेवा प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होणार आहे. याबाबत मुरारी लाल जलान यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, जेट एअरवेजचे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर असून त्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. जेट एअरलाईनने काही दिवसांपूर्वी यशस्वी उड्डाणांची पूर्तता पूर्ण केली. तसेच कंपनीला व्यावसायिक उड्डाणं पुन्हा सुरू करण्यासाठी नियामक मंडळाने मान्यता दिली आहे.

एकेकाळी भारतातील सर्वात मोठी खाजगी वाहक कंपनी म्हणून जेट एअरवेज ओळख होती. जेटच्या एअरलाईनमध्ये युएईच्या इतिहाद एअरवेजचा (UAE’s Etihad Airways) हिस्सा ही होता. पण ही एप्रिल, 2019 मध्ये कंपनीला आर्थिक चणचण भासू लागल्याने याची उड्डाण बंद करण्यात आली होती. पण जालान- कॅलरॉक (Jalan-Kalrock) यांच्या गुंतवणुकीमुळे जेट एअरवेजला पुन्हा एकदा आकाशात उड्डाणं घेणं शक्य होणार आहे.

कंपनीचे शेअर्स सुसाट!

गेल्या आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी जेट एअरवेजच्या शेअर्सने आज पुन्हा एकदा उसळी घेतली. बीएसई निर्देशांकावर जेटच्या एका शेअरची किंमत 113.55 रुपये होती. ती आज 119.20 रूपये झाली आहे. गेल्या 15 दिवसात या शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसून आले.

image source - https://bit.ly/3wFHdj2