मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची वायकॉम 18 (Viacom 18) ही ब्रॉडकास्ट कंपनी आणि जेम्स मर्डोक (James Murdoch) आणि स्टार इंडियाचे माजी कार्यकारी यांची बोधी ट्री यांच्यात गुंतवणूक करार झाला होता. बोधी ट्री एकूण 15,145 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. त्यापैकी 13,500 कोटी रुपये वायकॉम 18मध्ये गुंतवले जाणार आहेत, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी मागच्या वर्षी दिली होती. मात्र आता रिलायन्स (Reliance) 10,839 कोटी रुपयांची गुंतवणूक करून कंपनीचं नेतृत्व करेल. वायकॉमला एकूण 92 कोटी रुपयांचा झटका बसला आहे. आता कंपनी पूर्वी जाहीर केलेल्या घोषणेपेक्षा सुमारे 70 टक्के कमी गुंतवणूक करणार आहे. याची किंमत सुमारे 9200 कोटी आहे.
मंदीसह विविध कारणं
जगभरात मंदीचं वातावरण आहे. या मंदीमुळे गुंतवणुकीची रक्कम कमी करण्यात आलीय. 2023ची पहिली तिमाही जागतिक विलीनीकरण आणि अधिग्रहणांच्या बाबतीत गेल्या दशकातली सर्वात वाईट स्थितीत आहे. वाढते व्याजदर, महागाईचा वाढता स्तर आणि मंदीची भीती अशी अनेक कारण या निर्णयामागे अवलंबून आहेत. आमच्यात जो करार झाला त्याला पुढे जाण्यापासून ही कारणं रोखत आहेत, असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. अनेक कंपन्या मंदीच्या सावटाखाली आहेत. मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचं धोरण अवलंबलंय. कंपनीचा खर्च कमी करणं हा या मागचा उद्देश आहे. आता आगामी करारावरदेखील मंदीचा परिणाम जाणवत असल्याचं या निर्णयानंतर स्पष्ट झालंय. तब्बल 70 टक्के कमी गुंतवणूक बोधी ट्री रिलायन्सच्या वायकॉम 18मध्ये करणार असल्याचं स्पष्ट झालंय.
James Murdoch's Bodhi Tree slashes planned investment in Reliance JV Viacom18 https://t.co/8Z07oo7lvG pic.twitter.com/xCzT2fMlI6
— Reuters Asia (@ReutersAsia) April 14, 2023
रिलायन्सचा वाढता विस्तार
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीनं मागच्या काही वर्षांत आपला व्यवसाय अनेक पटीनं वाढवलाय. रिटेल, ई-कॉमर्ससह विविध क्षेत्रात आपला विस्तार केलाय. रिलायन्सची ब्रॉडकास्टिंग कंपनी वायकॉम 18ला 2023 ते 2027 या कालावधीत इंडियन प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकार मिळाले आहेत. सध्या कंपनीमार्फत आयपीएलचे (IPL) सामने विनामूल्य दाखवले जात आहेत. जिओ सिनेमा या प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे सामने क्रिकेटरसिक पाहत आहेत. त्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक फायदा होतोय. मोबाइलवर अधिक यूझर्स असल्यानं रिलायन्स लाभात आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हे सामने सुरू आहेत. त्यामुळे डेटाचा वापरही वाढला आहे. दरम्यान, याविरोधात एअरटेलनं तक्रार केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. क्रिकेटसह फुटबॉलच्या मॅचेसही फ्रीमध्ये दाखवण्यात आल्या होत्या. कंपनीने गेल्या वर्षी कतार याठिकाणी झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचं सर्व विनामूल्य प्रसारण केलं होतं.
शेअर्समध्ये तेजी
वाढता व्यवसाय पाहता अलीकडच्या काळात रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळतेय. आकड्यांवर नजर टाकल्यास मागच्या काही व्यावसायिक दिवसांमध्ये रिलायन्सच्या शेअर्समध्ये सुमारे 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. 24 मार्च रोजी कंपनीचा शेअर 2,203.50 रुपयांवर होता, जो नंतर वाढून 2,355.65 रुपये प्रति शेअर झाला. म्हणजेच या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 152.15 रुपयांची वाढ झालीय. गुरुवारीही कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली.