Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Internet Data Consumption: इंटरनेट डेटाचा वापर 10 ते 15% वाढणार; JioCinema वर मोफत IPL पाहायला मिळणार?

Internet Data Consumption

पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जूनपर्यंत इंटरनेट वापरात 10 ते 15% वाढ पाहायला मिळू शकते. कारण, मार्चपासून इंडियन प्रिमियर लीग (IPL) स्पर्धा सुरू होत आहे. या लीगच्या प्रसारणाचे हक्क जिओने खरेदी केले आहेत. आयपीएलची सर्व सामने जिओ सिनेमा मोफत दाखवणार असल्याचे बोलले जात आहे.

Internet Data Consumption: भारतामध्ये इंटरनेट वापर दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेटचा डेटा संपल्यावर अनेकांची चलबिचल होते. अस्वस्थ वाटू लागते इतकी सवय आपल्याला इंटरनेटची झाली आहे. सर्वात प्रथम रिलायन्स जिओने मोफत इंटरनेट देऊन ग्राहकांना जास्त डेटाची सवय लावली. आता भविष्यात भारतीयांच्या इंटरनेट वापरात आणखी 10 ते 15% वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे इंटरनेट डेटा पॅकसाठी आणखी पैसेही ग्राहकांना मोजावे लागतील.

IPL मुळे डेटाचा वापर वाढणार( Due to IPL matches data consumption will increase)

पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जूनपर्यंत इंटरनेट वापरात 10 ते 15% वाढ पाहायला मिळू शकते. कारण, मार्चपासून इंडियन प्रिमियर लीग (IPL) स्पर्धा सुरू होत आहे. या लीगच्या प्रसारणाचे हक्क जिओने खरेदी केले आहेत. आयपीएलची सर्व सामने जिओ सिनेमा मोफत दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोबाईलवरुन मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही वाढू शकते. 20 मार्चपासून IPL स्पर्धा सुरू होत आहे. मोबाईलवर एक संपूर्ण मॅच पाहण्यासाठी सुमारे 3 ते 4 जीबी डेटा लागू शकतो. मात्र, मोबाईल्सच्या रेग्यूलर प्लॅनमध्ये 2 जीबीपर्यंत डेटा येतो. IPL मॅच पाहण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे खर्च केली जाण्याची शक्यता आहे.

5G सेवेमुळेही इंटरनेट वापर वाढणार? (Internet use will increase due to 5G launch)

जिओने भारतातील शंभरपेक्षा जास्त शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू केली आहे. फास्ट इंटरनेट स्पीडमुळे ग्राहकांचा डेटा वापरही वाढण्याची शक्यता आहे. जिओने 5G प्लॅन्सवर मोठी ऑफर ग्राहकांना देऊ केली आहे. तसेच जर जिओ सिनेमावर आयपीएल मोफत स्ट्रीम झाले तर इंटरनेटचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. भारतातील काही ग्रामीण भागात टेलिव्हिजन कमी प्रमाणात पोहचला आहे. मात्र, अशा भागात इंटरनेट सुविधा पोहचली असल्याने या भागातील इंटरनेट वापर आणखी वाढेल. 

वायाकॉम 18 या रिलायन्स चॅनलमधील स्पोर्ट्स18 चॅनलकडे IPL प्रसारणाचे हक्क आहेत. जिओ सिनेमा हे अॅप रिलायन्स जिओ कंपनीचे असून वायाकॉम 18 ही अमेरिकन कंपनी असून दोन्ही कंपन्यांमध्ये जॉइंट व्हेन्चर आहे. प्रवासादरम्यान क्रिकेट मॅच पाहणाऱ्यांचीही संख्या देशात मोठी आहे. त्यामुळे डेटाचा वापर वाढू शकतो. जिओ सिनेमावर प्रसारित होणारे IPL इतर मोबाईल नेटवर्कही पाहता येऊ शकते. त्यामुळे एअरटेलही खास IPL साठी डेटा पॅक आणण्याची शक्यता आहे. 5G इंटरनेट च्या प्रमोशनसाठी जिओ मोफत IPL सुविधा देऊ करेल, असे जाणकारांचे मत आहे.