Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Forms: इन्कम टॅक्स विभागाकडून ITR-3 फॉर्म उपलब्ध; जाणून घ्या कोण हा फॉर्म भरू शकतो?

ITR Form-3 available on Income Tax Website

Income Tax Return Filing: व्यावसायिक आणि प्रोफेशनल व्यक्तींसाठी इन्कम टॅक्स विभागाने वेबसाईटवर कर विवरण सादर करण्यासाठीचा आयटीआर फॉर्म 3 (ITR-3) उपलब्ध करून दिला आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return-ITR) फाईल करण्याची अंतिम तारीख जवळ येऊ लागली आहे. सर्वसामान्य नोकरदार आणि पगारदार व्यक्तींसाठी रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. ही तारीख लक्षात घेऊन इन्कम टॅक्स विभागाने ITR-3 फॉर्म हा आपल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी विभागाने ITR-1, ITR-2 आणि ITR-4 हे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.

इन्कम टॅक्स कायद्यानुसार आयटीआर फॉर्मचे ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकार आहेत. आयटीआर भरताना तुम्हाला नेमका कोणता फॉर्म भरायचा आहे. याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार प्रत्येकाला वेगवेगळा फॉर्म भरावा लागतो. सगळ्यांना सगळे फॉर्म भरावे लागत नाही.

ITR-3 फॉर्म कोण भरू शकतो?

आयटीआर-3 हा फॉर्म कोणीही वैयक्तिक व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (Hindu Undivided Family-HUF) ज्यांचे वार्षिक उत्पन्न व्यवसाय किंवा एखाद्या प्रोफेशनमधून येते. ते आणि जे ITR-1, ITR-2 किंवा ITR-4 हा फॉर्म भरण्यास पात्र नाहीत. ते ITR-3 हा फॉर्म भरू शकतात.

ITR-3 फॉर्म कसा भरतात?

  • ITR-3 हा फॉर्म 3 वेगवेगळ्या पद्धतीने भरता येतो.
  • डिजिटल सहीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरता येतो.
  • इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (EVC) अंतर्गत ITR-3 फॉर्म भरता येतो.
  • तसेच ITR-3 मध्ये सर्व माहिती भरून तो इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवरून भरता येतो.

ITR भरण्याची डेडलाईन काय आहे?

आर्थिक वर्ष 2022-23 किंवा मूल्यांकन वर्ष 2023-24 (Financial Year & Assessement Year) साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2023 आहे. जे करदाते या तारखेच्या आत रिटर्न फाईल करणार नाहीत. त्यांना या तारखेनंतर 1 ते 5 हजार रुपये दंड भरून रिटर्न फाईल करावे लागेल.

कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 कधी दिला जातो?

साधारणपणे नियमानुसार कर्मचाऱ्यांना 15 जूनपर्यंत कंपनीकडून Form 16 मिळायला हवा. फॉर्म 16 मध्ये दोन भाग असतात. भाग A आणि भाग B. भाग A मध्ये कंपनीने कापलेल्या टॅक्सबद्दलची माहिती असते. तर भाग B मध्ये कर्मचाऱ्याचा एकूण पगार आणि कंपनीकडून विविध योजनांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दिलेली असते.

Source: www.livemint.com