Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Auto Expo 2023: Moto Bologna Passione ही इटालियन कंपनी भारतात लाँच करणार बाईक, जाणून घ्या फीचर्स

Auto Expo 2023

Image Source : http://www.indiaonlinemart.net/

Auto Expo 2023: इटालियन बाईक निर्माता (Moto Bologna Passione) आपली पहिली बाईक M502N भारतात 2023 मध्ये लॉन्च करणार आहे. MBP (Moto Bologna Passione) हा एक इटालियन ब्रँड आहे जो चिनी मालकीच्या कंपनीच्या अंतर्गत आणला जात आहे.

Auto Expo 2023: इटालियन बाईक निर्माता (Moto Bologna Passione) आपली पहिली बाईक M502N भारतात 2023 मध्ये लॉन्च करणार आहे. MBP (Moto Bologna Passione) हा एक इटालियन ब्रँड आहे जो चिनी मालकीच्या कंपनीच्या अंतर्गत आणला जात आहे. हा ब्रँड आदिश्वर ऑटो राइड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भारतात लॉन्च करत आहे. MBP भारतात ऑटो एक्सपो 2023 मध्ये पदार्पण करेल आणि भारतीय बाजारपेठेतील त्याचे पहिले उत्पादन M502N नेकेड बाईक असणार आहे.  यासोबतच चायनीज बाईक ब्रँड Keeway ऑटो एक्सपोमध्ये SR250 निओ-रेट्रो बाइक भारतात लॉन्च करणार आहे. 

इंजिन (engine)

M502N हे लिक्विड-कूल्ड, 486cc, पॅरलल-ट्विन इंजिन आहे जे 8,500 rpm वर 51 bhp पॉवर आणि 6,750 rpm वर 45 Nm टॉर्क निर्माण करते. बाईकचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

 वैशिष्ट्ये (Features)

बाईकच्या पुढील बाजूस प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. ब्रेकिंग हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर, याला पुढच्या बाजूला ट्विन डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला सिंगल डिस्क ब्रेक मिळतो. ही बाईक ड्युअल-चॅनल ABS सह येते. बाईक 120/60-ZR17 समोर आणि 160/60-ZR17 मागील कास्ट अलॉय रिम्सवर चालते. बाइकमध्ये पिरेली एंजल जीटी टायर्स वापरण्यात आले आहेत, जे बेनेली 502C सारखे आहेत. सीटची उंची 790mm आणि वजन 198kg आहे.

जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होणार….. (To be launched in January 2023…..) 

भारतात लॉन्च केल्यावर, ते Benelli Leoncino आणि Moto Morini Cimemezzo ला टक्कर देईल. आम्ही तुम्हाला सांगतो की Keyway आपले आठवे उत्पादन भारतीय बाजारपेठेत SR250 लाँच करणार आहे. Keyway भारतात आधीपासूनच SR125 निओ-रेट्रो बाईक विकत आहे, त्यामुळे बहुधा ती मोठ्या डिस्प्लेसमेंट इंजिनसह समान Style ची बाइक असेल.