अॅक्सेंचर (Accenture) या जागतिक स्तरावर आयटी सेवा देणाऱ्या कंपनीने 19000 कर्मचार्यांना कमी करण्याची घोषणा केली. FY2023 च्या दुसर्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर केल्यानंतर कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतलाा. जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचा प्रभाव वाढल्याने (Global Economic Recession) कंपनीने उत्पन्न आणि नफ्याचा अंदाज कमी केला आहे.
Table of contents [Show]
जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरुच
आर्थिक मंदीच्या काळात (Global Economic Recession) आता आयटी सेवा देणाऱ्या अॅक्सेंचरने म्हटले आहे की, ते 19000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनी आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. कंपनीने आपला वार्षिक महसूल अंदाजही कमी केला आहे.(Annual Revenue Estimate Reduced) याआधी अॅक्सेंचरने 2000 हून अधिक कर्मचार्यांना कामावरुन काढले होते. डिस्ने, अॅमेझॉन, मेटा, गुगल आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांनी मागील सहा महिन्यांत नोकर कपात केली आहे.
19000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार
आयटी सेवा कंपनी अॅक्सेंचरने गुरुवारी सांगितले की, ती तिच्या एकूण कर्मचार्यांपैकी सुमारे 2.5% कमी करणार आहे. सुमारे 19000 हजार कर्मचाऱ्यांना याच फटका बसेल. मंदी, महागाई आणि उत्पन्नात होणारी घट ही आव्हाने लक्षात घेत अॅक्सेंचरने मनुष्यबळ कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने वार्षिक महसूल आणि नफ्याचा अंदाजही कमी केला आहे.
अॅक्सेंचरने महसूल, नफ्याचा अंदाज कमी केला
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, अॅक्सेंचरला आता वार्षिक महसूल वाढ (Annual Revenue Growth) 8%आणि 10% दरम्यान अपेक्षित आहे. पूर्वीच्या 8%ते 11% वाढीच्या अंदाजाच्या तुलनेत अॅक्सेंचरने सांगितले की, ते आता 11.20 ते 11.52 डॉलर्स या पूर्वीच्या श्रेणीच्या तुलनेत 10.84 ते 11.06 डॉलर्स या श्रेणीत प्रति शेअर कमाईची अपेक्षा करते आहे.
याआधी कोणकोणत्या कंपनीने केली कर्मचारी कपात
अॅमेझॉन, विप्रो, मेटा फेसबुक, माइक्रोसॉफ्ट, गुगल, ट्विटर, इंटेल, सेल्सफॉर्स, पायपल, रिंग सेंट्रल, जी मेरजान, तसेच अनेक आयटी आणि बायोटेक कंपणींनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केलेली आहे.डिस्नेने कंपनीने देखील बुधवारी सुमारे 2200 कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली. एकूण कर्मचार्यांपैकी सुमारे 15% कर्मचारी कमी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मनोरंजन क्षेत्रातील डिस्ने एप्रिलमध्ये किमान 4,000 कामगारांना काढून टाकू शकते.
(News Source : ET And HT)