फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाला की गोल्डन बूटची चर्चा सुरु होते. यंदाही कतार फिफा वर्ल्डकपमध्ये गोल्डन बूट कोण पटकावणार हा उत्सुकतेचा विषय आहे. पण हा जो गोल्डन बूट (FIFA Golden Boot) खरंच सोन्याचा असतो का? याविषयी कुतूहल आहे. यंदाचा फिफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (FIFA World Cup Qatar 2022)
फिफाचा खर्च आणि कमाई किती भरपूर असते. ते तुम्हाला माहीत नाही का? कुणी म्हणेल, फिफा वर्ल्डकपमध्ये जगभरातील सर्वोत्तम 32 देशांच्या फुटबॉल टीम्सला प्रवेश मिळवावा लागतो. हे दिव्य पार केले तर सर्वोत्तम प्लेअर अर्थात पूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गोल जो खेळाडू करतो त्याला गोल्डन बूटने गौरवण्यात येते. या स्पर्धेची भव्यता आणि लोकप्रियता पाहता हा बूट सोन्याचाच असला पाहिजे, मात्र वस्तुस्थिती तशी नाही. हा बूट सोन्याचा नसतो.
खरंच हा शूज सोन्याचा असेल तर किती किंमत असेल? (If it is made by real gold how much cost)
हा बूट साधारणपणे एक किलो इतका असल्याचे मानले जाते. हा बूट पूर्णपणे सोन्याचा असेल तर तितके सोने हवे. सोयीसाठी आपल्याकडच्या सोन्याच्या दरात एक साधा हिशोब करून बघू. अगदी अचूक आकड्यात न शिरता 10 ग्राम सोन्यासाठी 50 हजार रुपये लागतील, असे गृहित धरले तर एक किलो वजनाचा हा बूट पूर्णपणे सोन्यापासून तयार करायचा झाल्यास किमान 50 लाख रुपये तरी हवेत. फिफा अथवा आयोजक देश हे या स्पर्धेसाठी प्रचंड खर्च करत असले आणि यातून त्यांना भरपूर पैसे मिळत असले तरी एका पुरस्कारासाठी ते एवढ बजेट ठेवत नाहीत.
सोने नाही मग गोल्डन बूट कशाने बनवला जातो ?
गोल्डन बूट हे सोन्याचे इलेक्ट्रोप्लेट केलेले मिश्र धातूचे बनलेले असू शकते. त्यावर सोनेरी रंग दिल्याने तो गोल्डन दिसतो. 1982 पासून फिफाने वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्डन बूट देण्यास सुरुवात केली होती.
गोल्डन शूजविषयी थोडेसे…
या पुरस्काराची सुरुवात 1982 मध्ये झाली. तेव्हा हा अवॉर्ड ‘गोल्डन शू’ या नावाने ओळखला जात असे. 2010 पासून यात बदल केला गेला. यानंतर ‘गोल्डन शूज’ या नावाने हा पुरस्कार ओळखला जाऊ लागला. विश्वचषक स्पर्धेत ज्याने सर्वाधिक गोल केले आहेत, त्याचा या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. दरम्यान, 1994 मध्ये असा निर्णय घेण्यात आला की, दोन खेळाडूंनी सारखे गोल केले असतील तर जास्त असिस्ट कुठल्या खेळाडूने केल हे बघितले जाते. फिफाची टेक्निकल टीम याबाबत निर्णय घेते.