फिफा वर्ल्ड कप हा दर 4 वर्षांनी होणार जगातला सर्वांत महागडा खेळ मानला जातो. संख्येचा विचार केला तर अर्ध्याहून अधिक जगात फुटबॉल खेळ खेळला जातो आणि तितकेच लोक तो पाहतात. भारतात क्रिकेटचे वेड सर्वाधिक आहे. पण भारतीयांच्या क्रिकेटप्रेमापेक्षा पाश्चात्यांसाठी सोकर हा जीव की प्राण आहे. दर 4 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम वेळोवेळी बदलत असते. आजच्या लेखात आपण 2022 FIFA World Cup साठी किती रुपयांच्या बक्षिसांची लयलूय केली जाणार आहे, हे जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
FIFA World Cup 2022च्या बक्षिसाची रक्कम किती आहे?
(FIFA World Cup2022) फिफा वर्ल्डकपची 22वी स्पर्धा 2022 च्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार कतार येथे होणार आहे. या फिफा वर्ल्डकपमध्ये विजयी संघाला किती रुपयांचं बक्षिस मिळणार आहे, माहितीये का तुम्हाला? कतारमधील फिफा वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक टीमला 1.5 मिलिअन ते 9 मिलिअन डॉलर म्हणजेच सुमारे 12 ते 75 कोटी रुपये फक्त टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी मिळणार आहेत. तर फिफा वर्ल्डकप विजेत्या संघाला 42 मिलिअन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 340 कोटी रुपयांची रक्कम देणार असल्याचे फिफाने जाहीर केले. तर उपविजेत्या टीमला 30 मिलिअन डॉलर (भारतीय रुपयांत 245 कोटी), दुसऱ्या उपविजेत्या संघाला 27 मिलिअन डॉलर (भारतीय रुपयांत 220 कोटी ) आणि तिसऱ्या उपविजेत्या संघाला 25 मिलिअन डॉलर (भारतीय रुपयांत 203 कोटी) इतकी रक्कम दिली जाणार आहे.
2018 च्या FIFA World Cup मधील प्राईस किती होते?
2018च्या फिफा वर्ल्ड कपशी तुलना केली असता 2022 च्या स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम वाढवण्यात आली आहे. 2018 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला 38 मिलिअन डॉलर (भारतीय रुपयांत अंदाजे 309 कोटी रुपये) बक्षिस देण्यात आले होते. यावर्षी अंतिम विजेत्या संघाच्या बक्षिसात 4 मिलिअन डॉलरने वाढ करण्यात आली. यावेळी 2022 विजेत्या संघाला 42 मिलिअन डॉलर बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. अर्थशास्त्राच्या नियमानुसार चलनवाढीचा दर विचारात घेतला असता, आज 2022 मध्ये 2018च्या वर्ल्ड कप बक्षिसाची रक्कम 40 मिलिअन डॉलरपर्यंत नक्कीच गेली असते. त्यामुळे यावेळी केलेली वाढ ही योग्य असल्याचे काही जणांचं म्हणणं आहे.
2022 मध्ये नवीन नियमांचा समावेश!
एकही सामना जिंकू शकला नाही तरी प्रत्येक संघाला विशिष्ट रक्कम दिली जाणार आहे. मागील वर्ल्ड कपनंतर फिफाने सर्व सहभागी संघांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. कतार येथे होणाऱ्या 32 संघांच्या वर्ल्ड कपमध्ये 17 ते 32व्या स्थानावर राहणाऱ्या संघांना जवळपास 80 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. (Winners of the FIFA World Cup will be awarded) फिफा सुरुवातीला वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेल्या सर्व संघांना सुमारे 11 कोटी रुपये देणार आहे. याशिवाय वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या संघांना जवळपास 69 कोटी रुपये देणार आहे. वर्ल्ज कप विजेत्यांना अंदाजे 340 कोटी मिळतील. बाहेरच्या देशात खेळले जाणारे फुटबॉल, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल, गोल्फ, बास्केटबॉल, टेनिस हे असे काही खेळ आहेत. जिथे सर्वाधिक रकमेची बक्षिसे असतात.
फिफाला या स्पर्धेतून किती पैसे मिळतात?
फिफाला कतार येथे होणाऱ्या FIFA World Cup 2022 मधून सुमारे 7 अब्ज डॉलर म्हणजेच 53,19,685 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. संपूर्ण स्पोर्ट्स इंडस्ट्री ही पैशावर चालते. पैसा हे क्रीडा जगतातील प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येकावर नियंत्रण ठेवते. क्रीडा उद्योग हा वाढत्या पैशाचा व्यवसाय बनत चालला आहे. टेलिव्हिजन, जाहिराती, प्रायोजकत्व करार हे उद्योग तेजीत येण्याचे प्रमुख कारण आहेत.
फिफा वल्ड कप ही जगातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा आहे. याचा प्रेक्षक वर्ग भरपूर प्रमाणात आहे. अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या फिफाच्या सदस्य संघटनांतील 32 संघांमध्ये ही स्पर्धा आहे. हे दर चार वर्षांनी होते. ब्राझील हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी पाच वर्ल्ड कप (सर्वाधिक) जिंकले आहेत.