Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL Auction 2022 : Ben Stokes साली चेन्नई सुपरकिंग्जनी मोजले 16.25 कोटी रुपये

Ben Stokes

Image Source : www.insidesport.in

IPL Auction 2022 : इंग्लिश ऑलराऊंडर बेन स्टोक्ससाठी चेन्नई सुपरकिंग्ज टीमने 16.25 कोटी रुपये मोजले आहेत. आज लिलाव सुरू होण्यापूर्वी स्टोक्सच्याच नावाची चर्चा होती. आणि त्याच्यासाठीची बोलीही शेवटपर्यंत रंगली

आयपीएल 2023 च्या लिलावासाठी (IPL Auction 2022) खेळाडूंची नावाची यादी जाहीर झाली तेव्हा यादीतलं सगळ्यात मोठं नाव अर्थातच इंग्लिश ऑलराऊंडर बेन स्टोक्सचं (Ben Stokes) होतं. 2018च्या वन डे वर्ल्ड कपपासून बेन स्टोक्स आपल्या ऑलराऊंड कामगिरीने क्रिकेट जगतात गाजतोय. लिलावात झालंही तसंच त्याच्यासाठीची बोली शेवटपर्यंत गाजली.    

सॅम कुरान (Sam Curran - KXiP 18.25 कोटी रु) आणि कॅमेरुन ग्रिन ( Cameroon Green - MI - 17.50 कोटी रु) यांच्या खालोखाल बेन स्टोक्स स्पर्धेच्या इतिहासातला तिसरा महागडा खेळाडू ठरला आहे.    

चेन्नई सुपरकिंग्ज टीमला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सकडून बेन स्टोक्ससाठी तगडी लढत मिळाली. पण, अखेर चेन्नई टीमची 16.25 कोटींची बोली सर्वाधिक ठरली. त्यामुळे बेन स्टोक्स पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोणीच्या साथीने एकाच टीममध्ये खेळताना दिसेल. यापूर्वी रायझिंग सुपरजायंट्स या टीमकडून दोघं एकत्र आयपीएलमध्ये खेळले होते.     

लिलावाचा फैसला लागल्यानंतर बेन स्टोक्सने ट्विट करत फक्त पिवळ्या रंगाचा एक चौकोन संदेशात टाकला आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा रंग पिवळा आहे. त्यावर चेन्नई टीममधल्या अनेकांनी त्याला Welcome लिहून त्याचं स्वागत केलं आहे.    

विशेष म्हणजे चेन्नई टीमकडे लिलाव सुरू झाला तेव्हा 20.45 कोटी रुपयेच शिल्लक होते. पण, त्यातले 80% त्यांनी बेन स्टोक्सवर खर्च केलेत. चेन्नई टीमसाठी बेन स्टोक्स महत्त्वाचा होता. कारण, महेंद्र सिंग धोणी चाळीशीकडे झुकलेला असताना टीमला नवीन कर्णधाराचीही गरज आहे.    

बेन स्टोक्स स्पर्धेच्या इतिहासातला सॅम कुरान आणि कॅमेरुन ग्रिनच्या पाठोपाठ सर्वात महागडा खेळाडूही ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये बेन स्टोक्सने 43 मॅचमध्ये 585 रन केले आहेत ते 124 च्या स्ट्राईक रेटनी. त्याचबरोबर त्याने 26 विकेटही घेतल्या आहेत. सध्याच्या घडीचा क्रिकेट जगतातला एक सर्वोत्तम आणि अनुभवी ऑलराऊंडर अशी त्याची ओळख आहे.