Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple layoffs: आयफोन उत्पादक कंपनी ॲपलही नोकरकपातीच्या वाटेवर; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Apple Layoffs 2023

Image Source : www.unsplash.com

Apple layoffs: नामांकित टेक कंपनी ‘ॲपल’ लवकरच नोकरकपात करणार आहे. कंपनी तिच्या डेव्हलपमेंट ॲण्ड प्रिझर्व्हेशन विभागात (Development and Preservation) ही नोकरकपात करणार असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात आर्थिक मंदीचे सावट दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. यामध्ये फेसबुकची मूळ कंपनी मेटा (Meta), ॲमेझॉन (Amazon), ट्विटर (Twitter) यांनी देखील नोकरकपात केली. अशातच आर्थिक मंदी आणि नोकरकपातीपासून कोसो दूर राहिलेली नामांकित टेक कंपनी ‘Apple’ लवकरच नोकरकपात करणार असल्याचे वृत्त ब्लूमबर्ग न्यूजने (Bloomberg News) दिले आहे. असे जर झाले, तर ही ॲपलची पहिलीच नोकरकपात (The first layoff) ठरेल. ही कपात कंपनीच्या कॉर्पोरेट रिटेल विभागात केली जाणार आहे.

कॉस्ट कटिंगसाठी केल्या ‘या’ गोष्टी

जगभरात आर्थिक मंदीचे सावट असताना ॲपलने (Apple) आतापर्यंत नोकरकपातीऐवजी वेगवेगळ्या मार्गांनी कॉस्ट कटिंग केले आहे. मात्र आजतागायत कंपनीने एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलेले नाही. अगदी कोरोना महामारीच्या काळातही कंपनीने हा निर्णय घेतला नव्हता. सुरुवातीला कंपनीने वेगवेगळ्या विभागातील नोकर भरती शिथिल केली, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा बोनस थांबवला आणि ट्रॅव्हल बजेट कमी केले. मात्र एवढे करूनही परिस्थिती कंट्रोल न झाल्याने आता ॲपल लवकरच नोकरकपातीचा निर्णय घेणार आहे.

‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार

ही कपात कंपनीच्या डेव्हलपमेंट ॲण्ड प्रिझर्व्हेशन विभागात (Development and Preservation) केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. हा विभाग जगभरात नवीन रिटेल स्टोअर उभे करण्यासाठी आणि डेव्हलप करण्यासाठी काम करतो. मात्र या नोकरकपातीसंदर्भात ॲपलने कोणतेही विधान किंवा अधिकृत माहिती दिलेली नाही. ही कपात नेमकी किती असेल, याबाबतही अजून उलघडा झालेला नाही. मात्र या बातमीमुळे या विभागातील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे.

इतर पदासाठी कर्मचारी करू शकतात अर्ज

नोकरकपात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या इतर विभागात भरतीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाणार असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी कर्मचाऱ्याला ठराविक दिवसांची मुदत दिली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल, त्यांना कंपनी 4 महिन्यांचा आगाऊ पगार देणार आहे.

आजतागायत अनेक कंपन्यांनी केलीये नोकरकपात

आर्थिक मंदीचा परिणाम सर्वच कंपन्यांवर झाला आहे. त्यामुळे अनेक छोट्या आणि मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. यामध्ये फेसबुकची मूळ कंपनी मेटाने (Meta) देखील कर्मचारी कपात केली आहे. ई-लर्निंग कंपनी Unacademy ने तब्बल 5 महिन्यात 4 वेळा नोकरकपात केली आहे. तसेच प्रसिद्ध आयटी कंपनी ॲक्सेंचरने (Accenture) आणि ॲमेझॉनने (Amazon) देखील कर्मचारी कपात केली आहे. या कर्मचारी कपातीमुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत.