इक्विटी आणि डेब्ट फंडातील होत असणाऱ्या गुंतवणूकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (AUM) नोव्हेंबरअखेर 40.49 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. याआधीच्या महिन्यामध्ये 39.53 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचली होती.
सेंसेक्स निफ्टी निर्देशांकात वाढ होत भांडवली बाजारात तेजी परतत असल्याचे दिसत होते. मात्र, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी नफा कॅश करण्यासाठी इक्विटी फंडांची विक्री याच काळात केल्याचे दिसून येत आहे, असा निष्कर्ष तज्ज्ञ काढत आहेत. यामुळे नोव्हेंबरमध्ये इक्विटी फंडात 76 टक्क्यांनी कमी होऊन 2 हजार 258 कोटी रुपये इतका मर्यादित राहील. असे म्युच्युअल फंडस इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
Equity Mutual Fund मध्ये 76 टक्के घट
म्युच्युअल फंड उद्योगातील सर्व योजनांमधील ओघ नोव्हेंबरमध्ये 13 हजार 236 कोटी रुपये होता. मागील महिन्यात 14 हजार 45 कोटी रुपये इतका होता. AMFI च्या आकडेवारीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडात नोव्हेंबरमध्ये 2 हजार 258 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आधीच्या महिन्यात 9 हजार 390 कोटी रुपये होती. मात्र असे असले तरी सलग 21 व्या महिन्यात इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Debt Mutual Fund 3 हजार 668 कोटी रुपयांची गुंतवणूक
इक्विटी फंडाव्यतिरिक्त डेट फंडांमध्येदेखील नोव्हेंबर महिन्यात 3 हजार 668 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आधीच्या ऑक्टोबर महिन्यात डेट फंडातून 2 हजार 818 कोटी रुपयांची निर्गुतवणूक झाली होती. इंडेक्स फंड, गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (इटीएफ), इतर ईटीएफ आणि परदेशात गुंतवणूक करणाऱ्या फंड ऑफ फंडसमध्ये 10 हजार 394 कोटींची गुंतवणूक झाली. यात प्रामुख्याने एकट्या इंडेक्स फंडामध्ये झालेल्या गुंतवणूकीचा वाटा 8 हजार 602 कोटी रुपयांचा आहे. मार्च 2021 पासून गुंतवणूकदारांचा इक्विटी फंडातील ओढा कायम आहे.