Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Updates: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा झाली दुप्पट, जाणून घेण्यासाठी वाचा

Budget 2023 Updates

Image Source : www.india.postsen.com

Budget 2023 Updates: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा चक्क दुप्पट झाली आहे. याचा फायदा आता ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार आहे.

Budget 2023 Updates: आज सकाळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा वाढवण्यात आली आहे. सीतारामण घोषणा करताना म्हणाल्या, सिनिअर सिटिझन सेविंग योजनेमध्ये (SCSS) जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली असून ती 15 लाखांवरुन 30 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त ठेवीची मर्यादा मंथली इन्कम अकाऊंट स्कीमची मर्यादा 4.5 लाखांवरुन 9 लाख रुपये केली आहे. याशिवाय जॉईन्ट अकाऊंटसाठी 9 लाखांवरुन 15 लाख रुपये मुदत वाढवण्यात आली आहे.

सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) बद्दल जाणून घ्या

SCSS ही केंद्र शासित पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात सन 2004 मध्ये झाली. निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरुपी आणि सुरक्षित पैसे मिळवून देणारी योजना म्हणून याची ओळख आहे.

SCSS ची वैशिष्ट्ये काय?

सरकार दर तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरात बदल करत असते.जी प्रामुख्याने बाजारातील प्रचलित दर, महागाई आणि इतर घटकांवर अवलंबून असते. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीच्या वेळी घोषित केलेला व्याजदर निश्चित स्वरूपाचा असून तो संपूर्ण मुदतीमध्ये बदलत नाही. 
या योजनेसाठी किमान 1,000 रुपयांची ठेवी ठेवता येते, तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात. यापुढे आता या मर्यादेत वाढ करुन ती 30 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षे असणार आहे. ती आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येणार आहे. गुंतवणूकदाराला खाते बंद करून मुदतपूर्व रक्कम काढायची असेल तर तो खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो.