Income Tax Budget 2023: नुकतंच अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी नवीन सुधारित आयकर प्रणाली(Income Tax) बाबत माहिती दिली. अर्थसंकल्पातील आयकराकडे संपूर्ण देशातील नोकरदार वर्गाचे, व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. मात्र सरकाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन नवीन कर रचना आणली आहे. या नवीन कर रचनेनुसार 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरातून सूट दिली जाणार आहे. जुन्या कर रचनेत ही सूट 5 लाखांपर्यंत मर्यादित होती. तर नवीन कर प्रणालीनुसार 3 लाखांपर्यंत कर माफ असणार आहे. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अशी असेल नवी कर प्रणाली(New Income Tax Slab)
गेल्या अनेक वर्षांपासून कर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र यापुढे 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ असणार असून आयकरची मर्यादा ही सरसरट 7 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. 3 ते 6 लाख उत्पन्नावर यापुढे 5 टक्के कर द्यावा लागणार आहे. याशिवाय 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10 टक्के कर आकारला जाणार आहे. 9 ते 12 लाख ज्यांचे उत्पन्न असेल, त्यांना 15 टक्के कर भरावा लागणार आहे. तर 15 लाखांच्या वर ज्यांचे उत्पन्न असेल, त्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.
नवीन कर रचना सोप्या पद्धतीने तक्त्याच्या स्वरूपात समजून घेऊयात.
नवीन कर प्रणाली समजून सांगताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जुन्या कर प्रणालीनुसार 9 लाखाचे उत्पन्न असणाऱ्यांना 60,000 रुपये कर भरावा लागत होता, जो आता नवीन कर प्रणालीनुसार(New Income Tax Slab) केवळ 45,000 रुपये भरावा लागणार आहे. नवीन कर प्रणाली ही सगळ्याच दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. या कर प्रणालीमुळे नोकरदारवर्ग, व्यावसायिक इ. फायदाच होण्यास मदत होईल.