Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2023: अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये एका क्लिकवर!

Budget

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. अर्थमंत्र्यांनी सुमारे 1 तास 25 मिनिटांचे भाषण केले. त्यांच्या या भाषणात त्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या. पगारदार कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात कर सवलतीबाबत मोठा दिलासा दिला गेलाय.

येत्या अर्थसंकल्पात लोककल्याणकारी योजनांवर सरकारचा भर असेल असा अंदाज वर्तवला जात होता. पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या आधीचा मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळेच या अर्थसंकल्पात लोकांना भावतील अशा घोषणा केल्या गेल्या आहेत.         

यंदाच्या अर्थसंकल्पातील प्राधान्यक्रम

1. सर्वसमावेशक विकास
2. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचवणे 
3. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे 
4. अव्यक्त क्षमतांचा विकास करणे 
5. हरित विकासासाठी प्राधान्य 
6. युवकांना प्राधान्य
7. वित्तीय क्षेत्राला प्राधान्य

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा 

  • सहकारी संस्थांचे संगणीकरण होणार, शेतकऱ्यांसाठी प्राधान्याने साठवणीची व्यवस्था करणार
  • मत्सोद्दोग व दुग्धव्यवसायासाठी सरकार विशेष प्राधान्य देणार 
  • देशात 157 नवीन नर्सिंग महाविद्यालय स्थापन करणार 
  • पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व राज्यांसोबत मिशन मोडवर काम करणार. 
  • यापुढे शहरातील नालेसफाई मशिनद्वारे करण्यात येणार, सफाई कर्मचारी नाल्यात उतरून सफाई करणार नाहीत, सरकारची महत्वाची घोषणा
  • हस्तकला आणि शिल्पकाम करणाऱ्या कामगारांसाठी पीएम विकास सहाय्यता विकास निधी पॅकेज जाहीर, विकासाचा लाभ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हे सरकारचे उद्दिष्ट
  • भरड धान्याला सरकार  प्राधान्य देणार तसे,  भारतीय भरड धान्य संस्था,हैदराबादला भरड धान्यात संशोधनासाठी आर्थिक सहाय्य करणार.भारताला मिलेट हब बनवण्याची घोषणा 
  • ग्रीन डेव्हलपमेंट, ग्रीन उद्योग, ग्रीन एनर्जीवर भर, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील 
  • देशाच्या विविध भागात राष्ट्रीय डिजिटल ग्रंथसंग्रहालय उभे करणार, तरूणांसाठी जिल्हा व पंचायत स्तरावर ग्रंथालय स्थापण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार 
  • कृषी कर्ज 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय 
  • आदिवासींच्या विकासासाठी 15 हजार कोटींची विशेष तरतूद, आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा उभारणार 
  • नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी जाहीर,डिजिटल भारताची गरज लक्षात घेऊन KYC प्रक्रियेत बदल करणार
  • वाहतुकीसंदर्भातील पायाभूत सुविधांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद
  • कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठीचा निधी 33 टक्क्यांनी वाढवत 10 लाख कोटींपर्यंत वाढवला
  • रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींचे बजेट, 2013 च्या तुलनेत रेल्वेचे बजेट 9 पटीनं बजेट वाढवलं
  • पीएम आवास योजनेच्या खर्चामध्ये 66 टक्के वाढ होणार
  • ऑरगॅनिक शेतीसाठी पीएम प्रणाम योजनेची घोषणा.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त पॅनची गरज,पॅन कार्डला कॉमन बिझनेस आयडेंटिफायर, डिजीलॉकर, आधार पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. 
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी देशात 3 सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
  • 5 जी नेटवर्क विकासासाठी देशात 100 लॅब्सची स्थापना केली जाणार 
  • 2023 पर्यंत 5 MMT ग्रीन हायड्रोजन निर्माणचं उद्दिष्ट
  • देशात 50 अतिरिक्त विमानतळ, एरोड्रोम आणि हेरीपोर्टची देखील उभारणी केली जाणार 
  • अर्बन इन्फ्रा डेव्हलपमेंट फंडसाठी प्रति वर्ष 10 हजार कोटी रुपये देण्यात येईल 
  • राज्यांना इन्टरेस्ट फ्री कर्ज दिली जाणार
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल 15 लाखाऐवजी 30 लाख रुपये गुंतवणूक करण्याची मुभा.
  • इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार. बॅटरीवरील आयात शुल्क कमी होणार.
  • टीव्ही, मोबाइल, इलेक्ट्रिक चिमनी, कॅमेरा लेन्स, मोबाइलच्या सुट्या भागाच्या बेसिक कस्टम ड्युटीमध्ये घट.
  • सहकाराच्या माध्यमातून पुढच्या आर्थिक वर्षात उत्पादन सुरू करणाऱ्या संस्थांसाठी सवलतीच्या दरात कर आकारणी.

नवीन टॅक्स प्रणालीनुसार टॅक्स आकारणी

Tax slab (2)