Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment/Savings: गुंतवणूक की बचत, तुमच्यासाठी काय योग्य असू शकते?

Investment/savings

Investment/savings: महिन्याच्या कमाईतून बचत करावी की गुंतवणूक? हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर माहित करून घ्या, गुंतवणूक की बचत, तुमच्यासाठी काय योग्य असू शकतं? गुंतवणूक म्हणजे बचत केलेल्या पैशांना स्टॉक, सोने, जमीन इत्यादींची खरेदी करण्यासाठी गुंतवणे होय. बचत केली तर त्यात वाढ कमी प्रमाणात होते किंवा होत नाही. ती रक्कम जशीच्या तशीसुद्धा राहण्याची शक्यता असते.

Investment/Savings: गुंतवणूक आणि बचत या दोन्ही बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. पण, अनेकांना यात कन्फ्युजन होतं की बचत करावी की गुंतवणूक? सर्वात आधी या दोनमधील फरक काय? हे समजून घेणे महत्वाचे आहे. पैशांची बचत करणे म्हणजे सामान्यतः संपत्ती जमा करण्याचा एक साधा प्रकार, जसे की बँक खात्यात पैसे ठेवणे. कपाटात किंवा घरात कुठेही पैसे जमवून ठेवणे होय. गुंतवणूक म्हणजे बचत केलेल्या पैशांना स्टॉक, सोने, जमीन इत्यादींची खरेदी करण्यासाठी गुंतवणे होय. बचत केली तर त्यात वाढ कमी प्रमाणात होते किंवा होत नाही. ती रक्कम जशीच्या तशीसुद्धा राहण्याची शक्यता असते. पण गुंतवणूक केली तर त्यात वाढ होण्याची शक्यता असते. तर माहित करून घ्या. तुमच्यासाठी काय योग्य असू शकत? बचत की गुंतवणूक. 

गुंतवणूक की बचत, काय योग्य असू शकते? 

बचत करण्यापेक्षा गुंतवणूक करणे चांगले आहे, जे अधिक महत्त्वाचे आहे, मी आधी बचत करायला सुरुवात करावी की त्याऐवजी मी माझे पैसे गुंतवावे, हे प्रश्न खरोखर गोंधळात टाकणारे आहेत. परंतु उत्तर सोपे आहे. बचत आणि गुंतवणूक हे तितकेच महत्त्वाचे आहे आणि जर तुम्हाला तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्हाला दोन्ही करणे आवश्यक आहे. दुसर्‍याशिवाय एक केल्याने तुमच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीत असंतुलन निर्माण होऊ शकते.

तुम्हाला हे देखील लक्षात ठेवण्याची गरज आहे की प्रत्येकच वेळी गुंतवणूक किंवा बचत करणे चांगले नाही. दोघांमधील योग्य निवड ही तुमच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. जर तुम्हाला अल्पकालीन उद्दिष्टांसाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही बचत करायला सुरुवात केली पाहिजे. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी तुम्हाला निधीची आवश्यकता असल्यास, गुंतवणूक सुरू करणे चांगले. आणि या दोन्हींचा समतोल राखल्याने तुम्हाला तुमची अल्प आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करता येतील.

बचत कशी करू शकता? 

अनुभवातून आलेली गोष्ट, जितके जास्त पेमेंट तितकेच तुमचे खर्च सुद्धा वाढतात. त्यामुळे कमविलेल्या पैश्यातून पहिला वाटा बचत करण्यासाठी काढून ठेवला पाहिजे. तुम्ही कमावलेल्या रकमेच्या कमीत कमी 30% बचत तुम्ही करायला पाहिजे. EMI, हप्त्यावर, उधारीवर कधीही वस्तू विकत घेणे टाळले पाहिजे. अनावश्यक खर्च टाळून सुद्धा बचत करता येऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे महिन्याचे नियोजन आधीच करून घेतले तर अधिक बचत करता येऊ शकते. 

गुंतवणूक कुठे करू शकता? 

पोस्टाच्या विविध योजना, म्यूचुअल फंड, विमा आणखी काही प्रकारात तुम्ही गुंतवणूक करु शकता. गुंतवणूक करण्याआधी त्याबाबत अधिकृत माहिती घेणे आवश्यक आहे. कोणत्याही फसवणुकीचे शिकार होणार नाही याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. गुंतवणुकीसाठी ठरलेली रक्कमच पाहिजे असे नाही, आता 1 रुपयांपासूनही तुम्ही गुंतवणूक करू शकता.