Inflation Rate in Argentina: संपूर्ण जगाला हल्ली महागाईचा सामना करावा लागतोय मात्र असा एक देश आहे जिथे सर्वाधिक महागाई असून सुद्धा तेथील नागरिकांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. हा देश आहे 'अर्जेंटिना(Argentina)'. लिओनेल मेस्सीच्या(Lionel Messi) नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाने फिफा फुटबॉल वर्ल्डकप(FIFA Football World Cup) जिंकला खरा पण त्याचा आनंदोत्सव अर्जेंटिनातील लोक अजूनही साजरा करत आहेत. जगातील सर्वाधिक महागाई मेस्सीच्या देशात आहे हे तुम्हाला ठाऊक होतं का? चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
अर्जेंटिनाची सध्याची स्थिती काय?(What is the current status of Argentina?)
अर्जेंटिना देशात महागाई आणि व्याजदर सर्वात जास्त प्रमाणावर आहे. फिफा फुटबॉल वर्ल्डकप(FIFA Football World Cup) जिंकल्यानंतर आजही तेथील लोक या महागाईचा विचार न करता आनंदोत्सव साजरा करण्यात व्यस्त आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के इतका आहे तर व्याजदर 75 टक्के आहे. हा आकडा अतिशय मोठा असल्याने भीतीदायक आहे. अर्जेंटिनाची लोकसंख्या(Population) 45 कोटी इतकी आहे. यापैकी 40 टक्के लोक हे दारिद्र रेषेखालील(poverty line) आहेत.
या देशातील खाद्य पदार्थांच्या किंमती अतिशय वाढल्या आहेत. येथील महागाई 100 च्या जवळपास आहे. म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर आपल्या सध्याच्या महागाईच्या दराच्या 15 पट महागाई अर्जेन्टिनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एखादी वस्तू जर आपल्याकडे 10 रुपयांना मिळत असेल तर तिचं वस्तू अर्जेन्टिनामध्ये 70 ते 80 रुपयांना तेथील नागरिकांना विकत घ्यावी लागत आहे. तेथील पिठाचा भाव 65 रुपये किलो आहे.
गगनाला भिडणारी महागाई आणि वाढता व्याजदराचा आकडा असतानाही संपूर्ण देश भविष्याची काळजी करण्याऐवजी फिफा विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत आहे.