भारतातील सेवा क्षेत्राचा चांगला विस्तार झाला आहे. भारतातील सेवा क्षेत्राची वृद्धी डिसेंबरमध्ये 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.
S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या सहाय्यक संचालक, पॉलियाना डी लिमा म्हणाल्या, "डिसेंबरमध्ये भारतीय सेवा क्षेत्रामध्ये स्वागतार्ह असा विस्तार दिसून आला, ज्याने 2022 च्या उत्तरार्धात मागणीची लवचिकता अधोरेखित केली.
मजबूत मागणी आणि अनुकूल बाजार परिस्थितीमुळे भारताच्या सेवा क्षेत्राने डिसेंबरमध्ये सहा महिन्यांच्या उच्चांकी वाढ केली. हंगामानुसार अॅडजस्ट केलेला S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस PMI व्यवसाय निर्देशांक नोव्हेंबरमधील 56.4 वरून डिसेंबरमध्ये 58.5 वर पोहोचला, जो 2022 च्या मध्यापासून विस्ताराचा सर्वात चांगला रेट दर्शवितो.
सलग 17व्या महिन्यात हा आकडा तटस्थ 50 श्रेणीच्या वर राहिला. परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) प्रमाणे 50 वरील आकडा विस्तार दर्शवतो तर 50 पेक्षा कमी आकडा घट दर्शवत असतो. S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या सहाय्यक संचालक पॉलियाना डी लिमा म्हणाले, "डिसेंबरमध्ये भारतीय सेवा क्रियाकलापांमध्ये स्वागतार्ह विस्तार दिसून आला, ज्याने 2022 च्या अखेरीस मागणीची लवचिकता अधोरेखित केली.
लिमा पुढे म्हणाले की, "आम्ही 2023 मध्ये पुढे जात असताना कंपनी उत्पादनाच्या दृष्टीकोनातून मजबूत आशावादाचे संकेत देत आहे. सुमारे 31 टक्के पॅनेलमधील सदस्यांनी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर केवळ दोन टक्के लोकांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे."