वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला आहे. सोन्याच्या साठयात वाढ झालेली दिसून येत आहे. देशाचा परकीय चलन साठा 6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1.268 अब्ज डॉलरने कमी होऊन 561.583 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो 562.851 अब्ज डॉलर इतका होता.
2023 च्या पहिल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. पहिल्या आठवड्यानंतर देशाचा परकीय चलन साठा 1.268 अब्ज डॉलरची घसरण झाली,असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ते 562.851 अब्ज डॉलर इतके होते.
केंद्रीय बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, परकीय चलन साठ्याचा सर्वात मोठा घटक असलेल्या परकीय चलन मालमत्ता 1.747 अब्ज डॉलरने घसरून 496.441 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे.
या काळात सोन्याचा साठा 461 दशलक्ष डॉलरने वाढला आणि 41.784 अब्ज डॉलर झाला. 2022 च्या सुरुवातीला देशाचा एकूण चलन साठा 633 अब्ज डॉलर इतका होता.
2022 मध्ये, डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) अनेक वेळा हस्तक्षेप करावा लागला. तसेच, अलिकडच्या काही महिन्यांत आवश्यक वस्तूंच्या आयातीच्या खर्चात झालेल्या वाढीमुळेही चलन साठ्यात घट झाली आहे.