Table of contents [Show]
खलिस्तान समर्थक गटाचा हल्ला
इंग्लंडसोबतच्या मुक्त व्यापार करारावरची (Free Trade Deal) बोलणी अद्याप सुरू आहे, असं भारतानं स्पष्ट केलंय. इंग्लंडमध्ये खलिस्तान समर्थकांच्या एका गटानं (Pro-Khalistan groups) इंग्लंडमधल्या भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला. त्यामुळे भारत-यूके यांच्यातल्या मुक्त व्यापारावरची चर्चा रखडली, असं वृत्त सर्वत्र पसरलं. मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी ही बाब फेटाळून लावलीय. ब्रिटीश माध्यमांच्या अहवालानुसार, भारतानं मुक्त व्यापार करारावर (FTA) यूकेशी वाटाघाटी थांबवल्या आहेत. गेल्या महिन्यात लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला झाला. या गटाच्या कृत्याचा इंग्लंड सरकारनं निषेधही केला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भारतानं मुक्त व्यापारासंदर्भातल्या वाटाघाटी थांबवल्याचं या अहवालात म्हटलंय.
'माध्यम अहवाल चुकीचा'
भारत सरकारनं हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलंय. टाइम्सनं ब्रिटीश सरकारमधल्या सूत्रांचा हवाला देऊन माध्यम अहवाल सादर केला होता. त्यात म्हटलं होतं, की भारत सरकारनं यूकेशी मुक्त व्यापार करारावरची चर्चा स्थगित केली होती. गेल्या महिन्यात लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला झाला होता. यातल्या हल्लेखोरांना ब्रिटीश सरकारनं अटक केली होती. मात्र या हल्ल्याचा किंवा संबंधित गटाच्या भूमिकेचा निषेध इंग्लंडनं केला नव्हता. भारताला याविषयी इंग्लंडची भूमिका न पटल्यानं व्यापार करार न करण्याचं ठरवलं, असं सर्वत्र वृत्त पसरलं. मात्र आता भारताकडूनच याचं स्पष्टीकरण आलं असून हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगण्यात आलंय.
मागच्या महिन्यातच व्यावसायिक वाटाघाटी पूर्ण
इंग्लंड सरकारनंही याबाबतचा खुलासा केलाय. या चर्चा निष्फळ आहेत. भारत मुक्त व्यापार करारासाठी इंग्लंडशी चर्चा करत असल्याचं यूके सरकारनं म्हटलं आहे. यूकेच्या व्यापार आणि वाणिज्य विभागाच्या प्रवक्त्यानं याविषयी माहिती दिलीय. ते म्हणतात, की इंग्लंड आणि भारत दोघंही एफटीएसाठी वचनबद्ध आहेत. मागच्या महिन्यातच व्यावसायिक वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत.
New Delhi denies The Times report, calls it "baseless"
— Alisha Rahaman Sarkar (@zohrabai) April 10, 2023
India ‘stops talks on UK trade deal’ after attacks on its embassy in London – report https://t.co/bobwoqEXh0
24 एप्रिलपासून चर्चेची पुढची फेरी
परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तालयात नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा निषेध केलाय. संबंधित ठिकाणी चोख सुरक्षाव्यवस्था असणार आहे. या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी त्याचबरोबर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रोपॉलिटन पोलिसांसोबत काम करत आहोत. ब्रिटन आणि भारत यांच्यात 20 ते 31 मार्चच्या दरम्यान या मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चेची आठवी फेरी झाली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकृतपणे आता चर्चेची पुढची फेरी 24 एप्रिलपासून लंडनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
खाली उतरवला होता तिरंगा
ब्रिटनमधल्या द टाइम्सनं ब्रिटनच्या सरकारी सूत्रांचा हवाला देत याबाबत वृत्त दिल्यानंतर लगेचच त्याचा इन्कार केलाय. 19 मार्च रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला. कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंगवर केलेल्या कारवाईच्या विरोधात निदर्शनं केली. अमृतपाल अद्याप फरार आहे. या हल्लेखोरांनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीमधून भारतीय ध्वज तिरंगा खाली उतरवला होता.
After reports on #India - #UK trade deal negotiations being stalled over #Khalistan issue, a UK Dept for Business & Trade spokesperson said “both UK & India are committed to delivering an ambitious & mutually beneficial FTA & concluded the latest round of trade talks last month”
— Maha Siddiqui (@SiddiquiMaha) April 10, 2023
ब्रिटनचे वरिष्ठ राजनयीक दिल्लीत
लंडनमध्ये झालेला हा प्रकार, माध्यमांमध्ये आलेलं मुक्त व्यापारासंदर्भातलं वृत्त या पार्श्वभूमीवर भारतीय मिशनमध्ये घडलेल्या घटनेच्या एका दिवसानंतर परराष्ट्र मंत्रालयानं एका वरिष्ठ ब्रिटिश मुत्सद्द्याला दिल्लीत बोलावलं. ब्रिटनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारात सुरक्षेत हलगर्जीपणा झाला. याबद्दल भारतीय परराष्ट्र विभागानं स्पष्टीकरण मागितलं. भारतीय मुत्सद्दी आणि कर्मचार्यांची यूके सरकार यूके सरकारकडून अवहेलना होत आहे, ती अस्वीकारार्ह आहे. तर या घटनेनंतर अशाप्रकारचा हल्ला आणि हे कृत्य बेकायदेशीर आहे. संबंधित उच्चायुक्तालयाच्या आवारातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल, असं ब्रिटीश परराष्ट्र सचिव जेम्स क्लेवरली यांनी सांगितलं.