Increase in mustard production: केंद्र सरकारच्या अंदाजानुसार मोहरीचे उत्पादन गेल्या वर्षी 11 दशलक्ष टन इतके होते. फेब्रुवारीमध्ये मोहरी पिकाची एकत्रित आवक 5,03,830 टन होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 45% अधिक आहे. मार्चमध्ये आवक आणखी वाढण्याची शक्यताही तज्ञांनी दर्शवली आहे.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2.0-2.5 दशलक्ष टन साठा व या वर्षीचे विक्रमी पीक मोहरीची फेब्रुवारी 2023 मध्ये वार्षिक 45% जास्त आवक आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सुमारे 15-20 टक्के घसरण झाली आहे. या वर्षी मोहरीच्या बाजारातील घसरण ही चिंतेची बाब आहे. यामुळे देशभरातील मोहरी व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसले आहे.
त्याचबरोबर ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब ठरू शकते, कारण मोहरीच्या तेलाच्या किमती 2022 च्या सुरुवातीच्या काळात 220-230 रुपये प्रति लीटरच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचणार नाही. मोहरीच्या तेलाची (Mustard Oil) आता तीन वर्षांच्या नीचांकी 1,090 रुपये प्रति 10 किलो या भावाने विक्री होत आहे. तुलनेने 19% ही किंमत कमी आहे. रिफाइंड सोयाबीन तेलाच्या किमतीत सुमारे 15% घसरण झाली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात मोहरीचे पिकं…..
महाराष्ट्रात मोहरीचे पीक फारसे घेतले जात नाही. परंतु मोहरीचे पीक प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यात अल्प प्रमाणात घेतले जाते. काही वेळ शेतकरी आवर्जून पीक घेत नाही पण त्यांच्या शेतात तण म्हणून मोहरीचे रोप निघते. आणि घरगुती वापरासाठी म्हणून त्याची वाढ होऊ दिल्या जाते. हवे मार्फत बीजप्रसार होऊन सुद्धा मोहरीचे चांगले उत्पादन घेणारेही शेतकरी विदर्भात आहे.
फेब्रुवारी मधील उत्पादनाचा अंदाज
देशात मोहरी लागवड आहे तरीही कोणते पिकं पोषक हवामान असल्याशिवाय वाढ घेत नाही. गेल्या देशात 91 लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झाली त्यातून 110 लाख टन मोहरी उत्पादन झाले होते. यंदा लागवडीची गती पाहता 120 लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. 28 फेब्रुवारी पर्यंत मुंबईच्या मंडईमध्ये मोहरीची आवक 5 क्विंटलच्या दरम्यान होती आणि सर्वसाधारण भाव हा 6 ते 8 हजारांपर्यंत होता.
2 मार्च पर्यंत हा भाव कायम राहीला. तेल व रिफाइंड तेलाच्या दरात थोडी घट दिसून आली आहे. रिफाईंड तेल दोन महिन्यांपूर्वी 190 रुपये लिटर होते. ते आता 165 रुपयांवर आले आहे. मोहरीच्या दरात 20 रुपयांची घट झाली आहे. हे तेल आता 170 रुपयांवरून 150 रुपयांवर आले आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली…..
मोहरीच्या काढणीला वेग आला असल्याने, मंडीच्या किमती 5,450 रुपये प्रति क्विंटल या किमान आधारभूत किमतीच्या (MSP) खाली येण्याची शक्यता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तेलबिया व्यापाराच्या या केंद्रामध्ये विक्रमी कापणी होऊनही, कमी किंमतीमुळे शेतकरी फायदेशीर उत्पन्नापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकरी उत्पादक संघटनांनी (FPO) कमोडिटीमध्ये फ्युचर्स ट्रेड पुन्हा सुरू करण्याची मागणी पुन्हा केली आहे.