• 31 Mar, 2023 08:02

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mustard Price fall : मोहरीची किंमत घसरली! किमतीने वर्षभरातील नीचांक गाठल्यामुळे शेतकरी चिंतेत

Mustard Price Hike:

Image Source : www.indiamart.com

Mustard Price fall: गेल्या काही दिवसात मोहरीच्या किमतीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे. मोहरीचा भाव मिनीमम सेलिंग प्राइस (MSP) किमतीच्या खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) सारख्या सरकारी संस्थांनी मोहरीची खरेदी करण्यास आणि एमएसपीचे रक्षण करण्यास सांगितले आहे.

मोहरीची किंमतीत वाढ झाल्यामुळे खाद्यतेल उद्योगाने घसरण रोखण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास प्रवृत्त केले आहे. नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) सारख्या सरकारी संस्थांना मोहरीची खरेदी करण्यास आणि एमएसपी'चे (MSP) रक्षण करण्यास सांगितले आहे, असे उद्योगाने सुचवले आहे. पाम तेल ताबडतोब प्रतिबंधित श्रेणीखाली आणावे किंवा कच्चे आणि शुद्ध पाम तेलातील फरक किमान 20% पर्यंत वाढवून रिफाइंड पाम तेलाच्या देशभरातील आयातीवर रोख लावावी अशी उद्योगाची अपेक्षा आहे, ज्यामुळे स्थानिक मोहरी शेतकऱ्यांना त्रास होतो आहे.

सरकारच्या अंदाजानुसार मोहरीच्या उत्पादनात वाढ

केंद्र सरकारच्या अंदाजानुसार मोहरीचे उत्पादन गेल्या वर्षी 11 दशलक्ष टन इतके होते. फेब्रुवारीमध्ये मोहरी पिकाची एकत्रित आवक 5,03,830 टन होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 45% अधिक आहे. ओरिगो कमोडिटीजचे सहाय्यक महाव्यवस्थापक (संशोधन) तरुण सत्संगी म्हणाले, “मार्चमध्ये आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सत्संगी म्हणाले: “2.0-2.5 दशलक्ष टन साठा व या वर्षीचे विक्रमी पीक मोहरीची फेब्रुवारी 2023 मध्ये वार्षिक 45% जास्त आवक आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सुमारे 15-20 टक्के घसरण झाली आहे. या वर्षी मोहरीच्या बाजारातील घसरण ही चिंतेची बाब आहे. यामुळे देशभरातील मोहरी व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसले आहे.

तसेच, ग्राहकांसाठी हे चांगलेच आहे कारण मोहरीच्या तेलाच्या किमती 2022 च्या सुरुवातीच्या काळात 220-230 रुपये प्रति लीटरच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचणार नाही. मोहरीच्या तेलाची (Mustard Oil) आता तीन वर्षांच्या नीचांकी 1,090 रुपये प्रति 10 किलो या भावाने विक्री होत आहे. तुलनेने 19% ही किंमत कमी आहे. रिफाइंड सोयाबीन तेलाच्या किमतीत सुमारे 15% घसरण झाली आहे.