Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Day 24 जुलैला आहे; पण तुम्ही 31 जुलै चुकवू नका!

Income Tax Day 24 जुलैला आहे; पण तुम्ही 31 जुलै चुकवू नका!

आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै, 2022 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आयटीआर रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल.

प्रचलित ब्रिटिशकालीन इतिहासातील नोंदीनुसार ब्रिटिश साम्राज्यातील सर जेम्स विल्सन यांनी सर्वप्रथम 24 जुलै, 1860 रोजी भारतात इन्कम टॅक्सची (Income Tax) कल्पना मांडली होती. त्यामुळे हा दिवस इन्कम टॅक्स दिवस (Income Tax Day) म्हणून ओळखला जातो. पण पगारदार व्यक्तींसाठी आयटीआर रिटर्न फाईल (ITR File) करण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2022 आहे. 24 जुलै हा इन्कम टॅक्स विभागाने साजरा करण्याचा दिवस आहे; पण तुमच्यासाठी 31 जुलै ही खूप महत्त्वाची तारीख आहे. ही तारीख तुम्ही पाळू शकला नाही तर तुम्हाला 5 हजार रूपयांचा दंड लागू शकतो.

ब्रिटिश राजवटीतील अधिकारी सर जेम्स विल्सन (Sir James Wilson) यांनी भारतात बजेट मांडताना 24 जुलै, 1860 रोजी Income Tax ची संकल्पना मांडली होती. इतिहासातील नोंदींनुसार सुरूवातीला हा टॅक्स फक्त ठराविक श्रीमंत व्यक्तींवर लादला जात होता. या टॅक्समुळे त्यावेळच्या श्रीमंत गटामध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे हा टॅक्स अवघ्या 5 वर्षांत म्हणजे, 1865 रोजी बंद करण्यात आला होता आणि पुन्हा नव्याने 1867 मध्ये नवीन कायदा तयार करण्यात आला होता.

भारतातील इन्कम टॅक्स विभागाचा इतिहास!

भारतातील इन्कम टॅक्स विभागाचा संघटनात्मक इतिहास 1922 पासून सुरू होतो, असं म्हटलं जातं. इन्कम टॅक्स कायदा, 1922 च्या आधारावर प्रथमच वेगवेगळ्या प्राप्तिकर प्राधिकरणांना विशिष्ट नावे देण्यात आली होती. हे प्रमाण मानलं तर आजच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये अस्सल भारतीय इन्कम टॅक्स विभागाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत.