Minimum Balance in Bank Account: तुमच्या बँक खात्यात शिल्लक न ठेवल्याबद्दल तुम्हाला कधीही दंड झाला असेल, तर माहित करून घ्या नवीन नियम. भविष्यात असे झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. नवीन नियम बनल्यानंतर तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या बँक आणि खात्यानुसार किमान शिल्लक रक्कम निश्चित केली जाते. खातेदाराला किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड भरावा लागतो.
सरकारचा निर्णय काय? (What is the government's decision?)
खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भगवंत किशनराव कराड यांनी गेल्या काही दिवसांत मोठे विधान केले होते. त्यांनी बँकांच्या संचालक मंडळाला आवाहन करून किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांच्या खात्यावरील दंड रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकता, असे सांगितले. कराड म्हणाले होते की, बँका या स्वतंत्र संस्था आहेत. अशा स्थितीत संचालक मंडळ किमान रक्कम न ठेवल्यास दंड माफ करू शकते.
त्यावेळी किमान रक्कम ठेवण्याबाबत माध्यमांनी अर्थ राज्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होता. ज्या खात्यांमध्ये विहित किमान पातळीपेक्षा कमी ठेवी जातात त्यावर कोणताही दंड आकारला जाऊ नये, अशा सूचना बँकांना देण्याचा सरकार विचार करत आहे का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला.
सर्वाधिक दंड महाराष्ट्रातील या 3 बॅंकांना (These 3 banks in Maharashtra have been fined the most)
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्वाधिक म्हणजे 4 लाख रुपयांचा दंड चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यालय असलेल्या श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेला लावण्यात आला आहे. त्यानंतर बीड जिह्यातील वैद्यनाथ अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बॅंकेला 2.50 लाख रुपये तर सातारा जिह्यातील वाई अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेला 2 लाख रुपयांचा दंड लावला आहे. याशिवाय मध्यप्रदेश राज्यातील इंदोरमधील इंदोर प्रीमिअर को-ऑपरेटीव्ह बॅंकेला 2 लाखांचा दंड लावण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पाटण नागरिक सहकारी बॅंक, पाटण, सातारा, जिजाऊ कमर्शिअल को-ऑपरेटीव्ह बॅंक, अमरावती या बॅंकांना प्रत्येकी 1.50 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.