शेअर बाजार सध्या चढ-उतार अनुभवत असला तरी काही इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला आहे. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार, एकूण २०२ इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना दहापेक्षा जास्त टक्क्यांचा वार्षिक परतावा दिला. त्यापैकी तब्बल ११ योजनांनी ३०% पेक्षा जास्त सीएजीआर (CAGR) रिटर्न मिळवून दिला आहे.
कोणते फंड सर्वात पुढे?
- क्वांट स्मॉल कॅप फंड – ३५.२६%
- मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड – ३४.११%
- निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड – ३२.८९%
- बंधन स्मॉल कॅप फंड – ३१.३८%
- एचडीएफसी स्मॉल कॅप फंड – ३१.१५%
- निप्पॉन इंडिया मल्टी-कॅप फंड – ३०.९६%
- एचएसबीसी स्मॉल कॅप फंड – ३०.७२%
- इन्व्हेस्को इंडिया स्मॉल कॅप फंड – ३०.७०%
- टाटा स्मॉल कॅप फंड – ३०.४२%
- एसबीआय कॉन्ट्रा फंड – ३०.०३%
- निप्पॉन इंडिया ग्रोथ मिडकॅप फंड – ३०.०२%
इतर फंडांचे प्रदर्शन
बाकीच्या १९१ फंडांनी मागील पाच वर्षांत साधारण १४% ते ३०% दरम्यान वार्षिक परतावा दिला आहे. उदाहरणार्थ, मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिडकॅप फंड ने २९.९९% रिटर्न मिळवून दिला.
थोडक्यात सांगायचं तर, स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंडांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा दिला आहे.