IIT Bombay Placements: मुंबई आयआयटीमध्ये सुरू असलेल्या प्लेसमेंटची फेज 11 ते 16 डिसेंबर दरम्यान पूर्ण झाली. त्यामध्ये यावर्षी आयआयटी(IIT) मुंबईच्या प्लेसमेंटच्या फेज वनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक नोकरीच्या ऑफर्स(Job Offer) स्वीकारल्या गेल्या आहेत. एकूण 283 कंपन्यांमधील देण्यात आलेल्या 1648 पैकी 1481 नोकऱ्यांच्या ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत. आयआयटीच्या एका विद्यार्थ्याला तर सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार देण्यात आला आहे. प्लेसमेंटच्या फेजवनमध्ये 25 विद्यार्थ्यांना वार्षिक 1 कोटींपेक्षा जास्तच पॅकेज मिळाले आहे. मुंबई आयआयटीच्या इतिहासात सर्वाधिक 1481 नोकऱ्यांच्या ऑफरचा विद्यार्थ्यांकडून स्वीकार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट(Research & Development) सेक्टरच्या पॅकेजमध्ये वाढ झाली आहे तर आयटी आणि सॉफ्टवेअर(IT &  Software)  सेक्टरच्या पॅकेजमध्ये घसरण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणत्या सेक्टरच्या पॅकेजमध्ये झाली वाढ आणि घट
मुंबई आयआयटीमध्ये(IIT) 63 आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत. यामध्ये 25 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना 1 कोटी पेक्षा अधिक प्रतिवर्ष पॅकेज मिळाले आहे. यावर्षी सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटी पॅकेज विद्यार्थ्याला मिळाले असून दुसऱ्या क्रमांकावर वार्षिक 1.31 कोटी पॅकेजच्या नोकरीची ऑफर विद्यार्थ्याने स्वीकारली आहे. मागील काही वर्षांच्या तुलना आता फायनान्स आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट(Research & Development) सेक्टरच्या अवरेज पॅकेजमध्ये वाढ झाल्याचा पाहायला मिळत आहे. तर आयटी अँड सॉफ्टवेअर(IT &  Software) सेक्टरला  देण्यात आलेल्या अवरेज पॅकेज ऑफर्समध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पीएचडी स्कॉलर्सची सुद्धा यंदाच्या वर्षीच्या फेज वनमध्ये अधिक संख्येने प्लेसमेंट पाहायला मिळत आहे.
प्लेसमेंट फेज 1 मधील विविध सेक्टर्स आणि त्यांना देण्यात आलेले अॅवरेज पॅकेज
- इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी - अॅवरेज पॅकेज -प्रति वर्ष- 21.20 लाख
- आयटी अँड सॉफ्टवेअर - अॅवरेज पॅकेज - प्रति वर्ष- 24.31 लाख
- फायनान्स -अॅवरेज पॅकेज - प्रति वर्ष- 41.66 लाख
- रिसर्च अँड डेव्हलपमेंट -अॅवरेज पॅकेज - प्रति वर्ष- 32.25 लाख
- कन्सल्टिंग - अॅवरेज पॅकेज - प्रति वर्ष- 17.27 लाख
मागील वर्षांमध्ये किती ऑफर्स स्वीकारल्या गेल्या?
2019-20 साली विद्यार्थ्यांनी 1,172 जॉब ऑफर्स स्वीकारल्या होत्या. त्यानंतर 2020- 21 मध्ये या ऑफर्सची संख्या कमी झाली आणि ती 973 वर आली. तर 2021-22 मध्ये रेकॉर्ड ब्रेक 1362 जॉब ऑफर स्वीकारण्यात आल्या. त्यामुळे यावर्षी पहिल्या सीझनमध्ये किती ऑफर्स विद्यार्थ्यांकडून स्वीकारल्या जातात याकडे लक्ष लागून राहील होत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            