Indian Currency: प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीचे छंद असतात. कुणाला पुस्तकं वाचण्याचा छंद असतो तर कुणाला गाणी ऐकण्याचा. तुम्हाला तर माहीतच असेल की बऱ्याच जणांना जुन्या नोटा(Note), नाणी(Coin) जमा करण्याचा छंद असतो. अर्थात त्या नोटा किंवा नाणी चलनात नसल्याने त्यांना फार काही किंमत नसते, पण म्हणतात ना हौसेला मोल नसतं. पण आता याउलट विचार केला तर, हौसेलाच मोल असतं! असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. एका वेबसाईटने याविषयी खुलासा केलायं. जर तुमच्याकडे त्यांनी सांगितलेली 1,000 रुपयांची नोट असेल तर, तुम्हालाही 3.5 लाख रुपये कमाईची संधी मिळू शकते. पण कसं चला जाणून घेऊयात.
कशी ओळखायची तुमच्याकडील नोट?
ही गोष्ट आहे 1000 रुपयाच्या नोटेची. आता तुम्ही म्हणाल, ती तर केव्हाच बंद झाली. पण हीच नोट तुमचं नशीब बदलू शकते. आजच्या घडीला काही चिल्लर पैसे आणि नोटा आता चलनातून बादा झाल्या असल्या तरी त्यांना किंमत आहे, कारण त्या भेटणं दुर्मिळ झालायं. इंग्लंडमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अनुक्रमांक असणारी आणि ऐतिहासिक महत्व असलेली चलनं, लाख मोलाची समजली जातात. चक्क एका नाण्याचे मूल्य 1000 पट जास्त असते.
असाच प्रकार 1000 रुपयांच्या नोटेसंबंधी घडलायं. ‘डेलीस्टारने(Dailystar)' केलेल्या दाव्यानुसार एक हजार रुपयांची नोट तुम्हाला लखपती करु शकते. नोटेच्या मूल्यापेक्षा किती तरी पट अधिकची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. जर तुमच्याकडे 1000 रुपयांची AH17 75 या अनुक्रमांकाची प्लास्टिक नोट असेल तर त्या व्यक्तीला 3.5 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम देण्याचं डेलीस्टारने(Dailystar) सांगितलंय. याशिवाय त्या व्यक्तीकडे डबल क्वीन हेडवाला 50 रुपये असणारा शिक्का असेल तर त्याची 1000 रुपयांपेक्षा अधिक किंमत असेल. तर क्यू गार्डसचा शिक्का गेल्या महिन्यात 17,000 रुपयांना विक्री करण्यात आला होता. तेव्हा जर तुमच्याकडे वरील अनुक्रमाची 1,000 रुपयाची जुनी नोट असेल तर तुम्ही लखपती झालाच म्हणून समजा.
1,000 रुपयाचीच नोट का?
AH17 75 या अणुक्रमांकाच्या नोटेला खूप महत्त्व आहे कारण त्यामध्ये प्रसिद्ध इंग्रजी लेखिका जेन ऑस्टेन(Jane Austen) यांची जन्म आणि मृत्यू तारीख आहे. ही लेखिका तिच्या सहा प्रमुख कामांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या जन्म 1775 मध्ये झाला होता आणि 1817 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.आणि या नोटेवर तीच तारीख दिसून येते, जी AH17 75 आहे. म्हणूनच तिची मागणी खूप जास्त आहे आणि कलेक्टर त्यासाठी 3.5 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास तयार आहेत.