Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कार इन्श्युरन्स (Car Insurance) : विद्युत वाहनांचा विमा उतरवताना...

कार इन्श्युरन्स (Car Insurance) : विद्युत वाहनांचा विमा उतरवताना...

2022 मध्ये विद्युत वाहनांसाठी विमा (Car Insurance) खरेदी करताना काही गोष्टी माहीत असायला हव्यात

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे विद्युत वाहने म्हणजेच इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) वा कार (Electric Car) खरेदी करण्याचा ट्रेंड येऊ लागला आहे. पण इलेक्ट्रिक गाड्या या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या तुलनेत महागड्या आहेत. या वाहनांसाठी विमा खरेदी करताना काही गोष्टी माहीत असायला हव्यात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या वाहनांच्या किमती अधिक असल्याने पुरेसे कवच देणारी विमा योजना खरेदी करावी.

सर्वसमावेशक संरक्षण (comprehensive coverage) : सर्वसमावेशक संरक्षण खरेदी करत असाल तर ही योजना आपल्याला थर्ड पार्टी लायबिलिटीज आणि वाहनाच्या झालेल्या नुकसानीपासून सरंक्षण देते.

ऑन डॅमेज कार इन्श्युरन्स (On Damage Car Insurance) : ऑन डॅमेज कार इन्श्युरन्स कव्हरेजमुळे अपघात, नैसर्गिक संकट, दंगल, आग यामुळे गाडीचे झालेले नुकसान तसेच चोरीच्या स्थितीत रिपेरिंग बिलात दिलासा मिळू शकतो.

पर्सनल अ‍ॅक्सिडेंट (Personal Accident) : पर्सनल अ‍ॅक्सिडेंट कवर घेतल्यास शारिरीक इजा, अंशतः किंवा पूर्ण अपंगत्व किंवा मृत याबाबत सुरक्षाकवच मिळू शकते. या विम्यामध्ये इन्शूअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यूड म्हणजेच आयडीव्ही जितका अधिक असेल, तेवढा हप्ता अधिक असेल; पण त्याचबरोबर नुकसान झाल्यास हा अधिक आयडीव्ही अधिक भरपाई प्रदान करतो.

क्लेम सेटलमेंट रेश्यो (claim settlement Ratio) : विमा पॉलिसी खरेदी करताना हा महत्त्वाचा निकष आहे. विमा घेताना संबंधित कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेश्यो तपासून घ्यायला हवा. वेगाने आणि कोणत्याही अडचणींशिवाय क्लेम निकाली काढणार्‍या विमा कंपनीची खरेदी करावी.

अ‍ॅड ऑन सुविधा : इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी विमा पॉलिसी खरेदी करताना आपण अधिक लाभ म्हणजेच अ‍ॅड ऑन देखील जोडू शकता. यासाठी आपल्याला अधिक हप्ता भरावा लागेल. कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसीला अ‍ॅड ऑन बेनिफिट जोडू शकता.  

झिरो डिप्रेशन (Zero Depreciation) : पॉलिसी घेताना झिरो डिप्रेशन म्हणजे शून्य झीजची सुविधा असणारे अ‍ॅड ऑन कव्हर घ्यावे. अन्यथा तुम्ही विम्यासाठी क्लेम केल्यास त्याची भरपाई देताना वाहनाचे डिप्रेशन गणले जाते. झिरो डिप्रेशनची निवड केल्यास क्लेम केलेल्या रकमेतून वाहनाच्या डिप्रेशनची रक्कम वजा केली जात नाही.

सध्या न्यू इंडिया इन्शुरन्ससह टाटा एआयजी, आयसीआयसीआय लोम्बार्ड, बजाज अलायन्स यांसारख्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनविम्याच्या क्षेत्रात सध्या अग्रेसरपणाने काम करत आहेत.