Aadhar-Pan Card Link: ज्यांच्याकडे पॅनकार्ड आणि आधारकार्ड अशी दोन्ही महत्त्वाची कार्ड आहेत आणि ते टॅक्स सवलतीच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. अशा पॅनधारकांनी 31 मार्च, 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जे पॅन कार्डधारक दिलेल्या मुदतीत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणार नाहीत. त्यांचे पॅन कार्ड 1 एप्रिल, 2023 पासून बाद केले जाणार आहे.
इन्कम टॅक्स विभागाकडून वेळोवेळी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. पण अजूनही अनेक पॅन कार्ड धारकांनी ते लिंक केलेले नाही. अशा कार्डधारकांवर कारवाई करण्याची इन्कम टॅक्स विभागाकडून मोहिम उभारण्यात आली. जे पॅन कार्डधारक दिलेल्या मुदतीत लिंक करणार नाही. अशा कार्डधारकांचे पॅनकार्ड 1 एप्रिल, 2023 पासून बाद केले जाणार आहे. जे पॅनकार्डधारक टॅक्स भरतात किंवा ज्यांना टॅक्समधून सवलत मिळत नाही. त्यांच्यासाठी पॅनकार्ड बाद होणे खूपच महागात पडू शकते.
इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याबाबतची सूचना देण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, “इन्कम टॅक्स कायदा, 1961 अनुसार, सर्व पॅनकार्डधारक जे टॅक्स सवलतीमध्ये येत नाहीत असे, त्यांनी 31 मार्च, 2023 पर्यंत आपले पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करून घेणे आवश्यक आहे. नाही तर 1 एप्रिल, 2023 पासून अशा पॅनकार्ड धारकांचे कार्ड बाद केले जाईल.”
अशाप्रकारे आधार आणि पॅन कार्ड लिंक करा
- इन्कम टॅक्स वेबसाईटच्या होम पेजवरील क्विक लिंक्स (Quick Links) या टॅबवरील लिंक आधार (Link Aadhar) क्लिक करा.
- Link Aadhar वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल.
- इथे तुम्हाला सर्वप्रथम पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आधार कार्डवर जसे नाव आहे; तसेच इथे टाकायचे आहे.
- ते झाल्यानंतर शेवटी तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे टीकमार्क करून द्यायची आहेत. पहिला प्रश्न आधार कार्डवर फक्त जन्म तारखेचे वर्ष आहे.
- दुसरा प्रश्न या प्रक्रियेसाठी आधार कार्डवरील माहिती तपासण्यासाठी मी तुम्हाला संमती देत आहे, अशी संमती द्यायची आहे.
- त्यानंतर लिंक आधार या बटनावर क्लिक केले की, तुमची प्रक्रिया पूर्ण होते.