इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) हा एक कर बचत म्युच्युअल फंड आहे, ज्या अंतर्गत तुम्ही आयकराच्या कलम 80C अंतर्गत तुमच्या वार्षिक उत्पन्नावर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. या अंतर्गत 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आलेला आहे. कर वाचवण्याव्यतिरिक्त, हा फंड गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील देतो. अशा परिस्थितीत, ज्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे आणि कर वाचवायचा आहे, ते या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. तुम्हीही 31 मार्चपूर्वी या फंडात गुंतवणूक करणार असाल, तर काही चुका प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) गुंतवणूक करताना कोणत्या चुका महागात पडू शकतात, ते जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
केवळ कर बचतीसाठी ELSS मध्ये गुंतवणूक करू नका
केवळ कर बचतीसाठी ईएलएसएसमध्ये (ELSS) गुंतवणूक करू नये, असं तज्ज्ञ सांगतात. या फंडा अंतर्गत ट्रॅक रेकॉर्ड, गुंतवणुकीची शैली आणि इतर गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. परफॉर्मन्स बेस आणि मजबूत पोर्टफोलिओच्या आधारावर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग फंडाची निवड करावी, कर बचत हा त्याचा एक फायदा म्हणून तुम्ही पाहू शकता.
बाजारानुसार निधी निवडा
मार्केटनुसार फंडांची निवड करताना कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. या तुलनेत या इक्विटी फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करणे अधिक योग्य ठरू शकते. एकरकमी गुंतवणुकीऐवजी, तुम्ही या आर्थिक वर्षात SIP मध्येही गुंतवणूक सुरू करू शकता.
जास्त जोखीम घेऊ नका
इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम हा उच्च जोखमीचा फंड आहे. अशा स्थितीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जी व्यक्ती दीर्घकाळ गुंतवणूक करत राहते त्याला नफा मिळू शकतो. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही पीपीएफसारख्या (PPF) योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. जी अधिक सुरक्षित आहे.
कोणताही फंड निवडू नका
जर तुम्ही ELSS मध्ये ठराविक एका फंडची निवड करत असाल, तर तुम्हाला त्याबद्दलचे तपशील माहीत असले पाहिजे. या फंडाचा निधी परफॉर्मेशन आधारे निवडला जावा. याशिवाय बाजारातील स्थितीनुसार फंडाची निवड करावी. कोणत्याही फंडाची निवड सरसकट केल्यामुळे नुकसान होऊ शकते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)