Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IDFC First Bank : आयडीएफसी फर्स्ट बँकच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

IDFC First Bank

Image Source : www.livemint.com

देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card Payment) करतात. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) क्रेडिट कार्डधारकांना रेंट पेमेंटवर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card Payment) करतात. अनेकजण घराचे भाडेही क्रेडिट कार्डने भरतात. Paytm, Credit (CRED), Nobroker, Payzapp, RedGirraffe सारख्या अनेक प्लॅटफॉर्मने देखील क्रेडिट कार्डने भाडे भरणे फायदेशीर केले आहे. मात्र, आता असे करणे महागात पडणार आहे. वास्तविक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बँक ऑफ बडोदा नंतर आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डधारकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनी क्रेडीट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर 1 टक्के शुल्क आकारेल. हा नियम 3 मार्च 2023 पासून लागू होणार आहे.

आतापर्यंत फक्त हाच चार्ज लागत होता

आतापर्यंत आयडीएफसी फर्स्ट बँकेने अशा व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले नाही. या कारणास्तव, अनेक भाडेकरू Paytm, Cred, NoBroker, PayZap, Red Giraffe, Mobikwik, PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर रेसिपिएंट ऑप्शनमध्ये घरमालकाच्या बँक खात्याचे तपशील किंवा युपीआय अँड्रेस प्रविष्ट करायचे आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करायचे. मात्र, हे थर्ड-पार्टी प्लॅटफॉर्म क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी सुविधा शुल्क आकारतात.

यांनीही शुल्क वाढवले

यापूर्वी, आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्डधारकांकडून एक टक्का प्रक्रिया शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. प्रोसेसिंग फी 20 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाली आहे. त्याच वेळी, एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. कंपनी एसबीआय कार्डद्वारे केलेल्या भाड्याच्या पेमेंटवर 99 रुपये अधिक जीएसटी आकारत आहे. एसबीआय कार्डचा हा बदल 15 नोव्हेंबर 2022 पासून प्रभावी आहे. बँक ऑफ बडोदा 1 फेब्रुवारी 2023 पासून क्रेडिट कार्डद्वारे भाड्याच्या पेमेंटवर 1% शुल्क आकारत आहे.