Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Different Types of Credit Cards: जाणून घ्या, क्रेडिट कार्ड म्हणजे काय व याचे विविध प्रकार

Different Types of Credit Cards

Credit Cards Variety: क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचे उधार कार्डच आहे. ज्यावेळी तुमच्याकडे पैसे नसतील, त्यावेळी तुम्ही या कार्डव्दारे उधारी ठेवू शकता. शक्यतो बऱ्याच लोकांजवळ क्रेडिट कार्ड असते. उधारीबाबतचे कार्ड सर्वांनाच माहिती आहे, पण क्रेडिट कार्डचेदेखील विविध प्रकार आहेत, ते जाणून घेवुयात.

Different Types of Credit Cards: क्रेडिट कार्डचा उपयोग उधारी व्यतिरिक्त आपल्याकडे खरेदी करण्यापासून ते वीज बिल भरण्यापर्यंत सर्व प्रकारची क्रेडिट कार्डस् उपलब्ध आहेत, फक्त त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. भारतात किती प्रकारचे क्रेडिट कार्डस् उपलब्ध आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहुयात.

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्स (Travel Credit Cards)

ट्रॅव्हल क्रेडिट कार्डने तुम्ही सर्व एअरलाइन तिकीट बुकिंग, बस आणि रेल्वे तिकीट बुकिंग, कॅब बुकिंग व आदि गोष्टींवर सवलत मिळवू शकता. जेव्हा तुम्ही तिकीट बुक कराल तेव्हा तुम्हाला काही पॉइंट मिळतील. जे तुम्ही नंतर रिडीम करू शकता.

इंधन क्रेडिट कार्ड (Fuel Credit Card)

इंधन क्रेडिट कार्डच्या मदतीने, तुम्ही पेट्रोल पंपांद्वारे चालवल्या जाणार्‍या ऑफरचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही अतिरिक्त रिवॉर्ड पॉइंट मिळवून वर्षभर भरपूर पैशांची बचत करू शकता.

रिवार्ड क्रेडिट कार्ड (Rewards Credit Card)

या प्रकारच्या क्रेडिट कार्डचा प्रत्येक व्यवहार निश्चितपणे एक किंवा इतर बक्षीसासह करता येतो. काही कार्डांवर कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध असते. त्यामुळे तुम्ही कार्डद्वारे कुठे ही पैसे भरल्यास तुम्हाला एक किंवा दोन टक्के कॅशबॅक मिळते.

शॉपिंग क्रेडिट कार्ड (Shopping Credit Card)

शॉपिंग क्रेडिट कार्डसह खरेदी किंवा व्यवहारांवर सूट मिळविण्यासाठी पार्टनरशीप असलेल्या स्टोअरमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी केल्यास, तुम्हाला कॅशबॅक, डिस्काउंट व्हाउचर आदि गोष्टींचा लाभ घेता येईल.

सुरक्षित क्रेडिट कार्ड (Secure Credit Card)

ज्या लोकांचा क्रेडिट स्कोअर म्हणजेच CIBIL स्कोर खूपच खराब आहे त्यांनी सुरक्षित क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा. खराब क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी हे कार्ड खूप उपयुक्त ठरते. तुम्ही नवीन खाते उघडत असलात किंवा कर्जासाठी अर्ज करत असलात तरी, तुम्ही सुरक्षित क्रेडिट कार्डने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता.

बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्ड (Balance Transfer Credit Card)

जेव्हा तुम्हाला जास्त व्याज किंवा दंड टाळायचा असेल, तेव्हा तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्ड घेऊ शकता. तुमची सध्याची क्रेडिट कार्डची देय रक्कम कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.