FD Scheme : ज्या गुंतवणूकदारांना खात्रीशीर परतावा पाहिजे असते, ते मुदत ठेवींमध्ये म्हणजेच एफडीमध्ये गुंतवणूक करणे योग्य मानतात. आणि गुंतवणूकदारांचा एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा वाढता कल बघुन बँकादेखील एफडी गुंतवणूकीवर अधिक व्याज देत आहे. याचअंतर्गत आयडीबीआय बँकेने देखील त्यांच्या FD योजनेअंतर्गत व्याज दरात सुधारणा केली आहे. आयडीबीआय बँकेचे नवीन व्याजदर 12 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहे.
सर्वसामान्य ग्राहकांसाठी आयडीबीआयचे FD व्याजदर
- IDBI बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD मध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. बँकेच्या एफडी योजनेत 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवली जाऊ शकते.
- आयडीबीआय बँकेने 7 दिवसांपासून ते 30 दिवसांदरम्यान परिपक्व होणाऱ्या एफडीवर 3 टक्के व्याजदर देऊ केला आहे.
- IDBI बँक 31 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीतील एफडीसाठी 3.35 टक्के व्याज दर देऊ करीत
आहे. - IDBI बँक 46 दिवस आणि 90 दिवसांच्या FD साठी 4.25 टक्के व्याज दर देत आहे.
- IDBI बँक 91 दिवस ते 6 महिन्यांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर 4.75 टक्के व्याजदर देईल.
- IDBI बँक सहा महिन्यांपेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीतील एफडीसाठी 5.5 टक्के व्याज दर देत आहे.
- एक वर्ष ते दोन वर्षात (४४४ दिवस वगळता) मुदतपूर्ती होणाऱ्या FD वर ६.७५ टक्के व्याजदर दिल्या जात आहे.
- 444 दिवसांच्या मुदतीच्या विशेष ठेवींसाठी, गुंतवणूकदारांना IDBI बँक 7.15 टक्के व्याजदर देत आहे.
- IDBI बँक 6.5 टक्के व्याजदर दोन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर देत आहे.
- आयडीबीआय बँक 5 वर्षांच्या कालावधीसह कर बचत एफडीवर 6.5 टक्के व्याज दर देत आहे.
- IDBI बँक 5 वर्षे ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर 6.25 टक्के व्याज देत आहे.
ज्येष्ठ नगरीकांसाठी आयडीबीआयचे FD व्याजदर
- आयडीबीआय बँक सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देत आहे.
- IDBI बँक सात दिवस ते ३० दिवसांच्या मुदतीच्या FD वर ३.५ टक्के व्याजदर देत आहे.
- IDBI बँक 31 दिवस ते 45 दिवसांच्या दरम्यानच्या मुदतीच्या FD वर 3.85 टक्के व्याजदर देत आहे.
- तसेच 46 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 4.75 टक्के व्याजदर दिल्या जात आहे.
- IDBI बँक 91 दिवस ते सहा महिन्यांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 5.25 टक्के व्याज देत आहे.
- IDBI बँक सहा महिने ते एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या FD वर 6 टक्के व्याजदर देत आहे.
- IDBI बँक 7.25 टक्के व्याज एक वर्ष ते दोन वर्षांच्या दरम्यान (444 दिवस वगळता) परिपक्व झालेल्या एफडीसाठी दिले जात आहे.
- IDBI बँक 444 दिवसांच्या FD साठी 7.65 टक्के व्याजदर देणार आहे.
- तसेच दोन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ७ टक्के दराने व्याजदर IDBI तर्फे दिल्या जाईल.
- आयडीबीआय बँक 5 वर्षांच्या कालावधीसह करबचत एफडीवर 7 टक्के व्याज दर देत आहे.
- पाच वर्षे ते 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर आयडीबीआय बँक देत आहे.
- आता जवळजवळ अनेक बँकांनी विविध प्रकारच्या एफडी योजना अंमलात आणून चांगले व्याजदर देण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयने रेपो दर कायम ठेवला असला तरी, याआधी सातत्याने रेपो दरात झालेली वाढीमुळे बँकांना एफडी दरात वाढ करावी लागली आहे.