रिलायन्स Jio ने Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime Video सोबत स्पर्धा करण्यासाठी आपलं नवं ओटीटी ॲप आणण्याची तयारी चालवली आहे. कदाचित जिओ वूट असं त्याचं नाव असेल अशा चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्स पाठोपाठ मनोरंजन क्षेत्रातही रिलायन्स कंपनी आता पूर्ण ताकदीनिशी उतरताना दिसणार आहे. हे ॲप नेमकं कसं असेल हे अजून बाहेर आलेलं नाही. पण, रिलायन्सच्या यापूर्वीच्या डिजिटल रणनितीप्रमाणे ते फ्री म्हणजे मोफत असणार नाही. तर त्यासाठी काही मासिक शुल्क कंपनी आकारेल असं बोललं जात आहे. पण, इतर स्पर्धेच्या तुलनेत रिलायन्सचं शुल्क कमी असेल.
मासिक सदस्यता योजना 99 रुपये?
JioVoot ॲपची प्रारंभिक मासिक सदस्यता योजना 99 रुपये असू शकते. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी योग्य असा प्रीमियम प्लॅन लाँच करू शकते. किंवा वार्षिक सदस्यत्व प्लॅन देखील देऊ शकते. जीओ वूटने अद्याप ॲपच्या लॉंचिंगची तारीख जाहीर केली नाही. मात्र, हे ॲप मे महिन्याच्या अखेरीस लाँच होऊ शकते. रिलायन्सचं हे ॲप वापरण्यासाठी कंपनी जिओचे नवीन प्लानही लाँच करणार आहे.
JioCinema बदलणार JioVoot मध्ये
Jio ने आपल्या जुन्या JioCinema ॲपचे नाव बदलून JioVoot केले आहे. JioCinema हे ॲप सध्या ग्राहकांना विनामुल्य सेवा देत आहे. या ॲपवर आयपीएल2023 चे थेट प्रक्षेपण केले जात आहे. तर, याच JioCinema ॲप वर सगळ्यात जास्त लोकांनी धोनिचा आयपीएल सामना बघण्याचा रोकॉर्ड मोडला होता. हेच ॲप आता लवकरच JioVoot मध्ये बदलु शकते.
इतर कंपन्यांशी होणार स्पर्धा
JioVoot ॲपवर 100 हून अधिक नवीन चित्रपट आणि टीव्ही शो जोडले जातील. या नवीन मनोरंजनात्मक गोष्टींसाठी शुल्क आकारले जाईल. बॉलीवूड चित्रपट थेट JioVoot ॲपवर प्रदर्शित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच,जिओचे खास चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होऊ शकते. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओसारख्या प्लॅटफॉर्मला स्पर्धा करणे कठीण जाईल.
Reliance ने ज्यावेळी Jio इंटरनेट सेवा बाजारात आणली होती, त्यावेळी ती इतर कंपण्यांच्या तुलनेत सगळ्यात स्वस्त सेवा देणारी कंपनी होती. काही काळानंतर जेव्हा Jio चे ग्राहक प्रचंड वाढले, तेव्हा कंपनीने शुल्क वाढविले. हीच बाब JioVoot च्या बाबतीत लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जोपर्यंत ग्राहकाला इतर कंपन्यांच्या तुलनेत JioVoot वर कमी किमतीत जास्त मनोरंजन सेवा मिळेल, तोपर्यंत ग्राहक JioVoot चे सदस्यत्व घेत राहील.