Bullion business: प्रत्येक व्यावसायिकाला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते. लोखंडाचे भांडे बनवतो त्याला लोहार, लाकूडकाम करतात त्यांना सुतार, शिवणकाम करतो त्याला शिंपी या नावाने आपण संबोधतो. त्याचप्रमाणे, सोने आणि चांदीचे विक्रेता असतात त्यांना सोनार म्हटले जाते. काही वर्षापूर्वी प्रत्येक जण आपापले व्यवसाय करायचे. पण, आता तसं होत नाही, ज्याला जो व्यवसाय आवडला तो करतात. तुम्ही जर सोनेचांदीचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर, त्यासाठी लागणारे भांडवल किती? नोंदणी करावी लागते का? या गोष्टी माहित करून घेऊया.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बजेट तयार करावे लागेल. त्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या सराफा बाजाराचा अभ्यास करून अंदाज घ्या. त्यातुन सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतर जागा शोधावी लागेल. त्यानंतर परवाना (Shop License) आवश्यक आहे. परवान्याशिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकणार नाही. परवान्याशिवाय तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केल्यास हा व्यवसाय केल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आणि तुमचा व्यवसायही बेकायदेशीर मानला जाईल. परवाना मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटला (LLC) भेट द्यावी लागेल. यानंतर, तुम्ही तुमच्या व्यवसायाची सर्व माहिती टाकून तुमच्या व्यवसायाची नोंदणी करू शकता. नोंदणी केल्यानंतर, काही दिवसानंतर परवाना मिळेल.
सोने चांदी व्यवसायात किती गुंतवणूक करावी लागेल?
जर तुम्ही सोन्या-चांदीचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या व्यवसायात भरपूर पैसे गुंतवावे लागतील. कारण बाजारात सोन्या-चांदीची किंमत खूप जास्त आहे, आणि अजूनही वाढतच आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि सोन्या-चांदीचे दागिने, खरेदी करण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील. अशा प्रकारे, सुरुवातीला तुम्हाला या व्यवसायात किमान 10 ते 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. जर तुमच्याकडे तेवढे पैसे नसतील तर तुम्ही हा व्यवसाय करण्यासाठी कर्ज देखील घेऊ शकता.
तुम्हाला सोने-चांदीच्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्ही यासाठी दोन प्रकारे कर्ज घेऊ शकता. एमएसएमई कडून कर्ज घेण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमचा व्यवसाय एमएसएमईमध्ये नोंदणीकृत करावा लागेल. एमएसएमईमध्ये नोंदणी केल्यानंतरच तुम्ही तुमच्या व्यवसाय कर्जासाठी अर्ज करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज हवे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बिझनेस प्लॅन तयार करावा लागेल. जेणेकरून बँकेत तुमचा बिझनेस प्लॅन सहज समजून घेऊन घेतील. त्यानंतर सर्व कागदपत्रे घेऊन बँकेत जमा करा. त्यानंतर बँक अधिकारी तुमची कागदपत्रे वाचून तुमच्या व्यवसायासाठी कर्जाची रक्कम ठरवतील. यानंतर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता. सर्व व्यवसायात नफा मिळविण्यासाठी त्या व्यवसायाचे मार्केटिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही व्यवसायाचे मार्केटिंग नीट केले नाही तर तुम्हाला व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते.
दागिने विक्रीसाठी प्लॅटफॉर्म तयार करा..
आता मार्केटिंगसाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यावर नोंदणी करून तुम्ही विक्री करू शकता. फेसबुक, इनस्टाग्राम पेज तयार करून तुमच्याकडे असलेले नवीन डिझाईन त्यावर अपलोड करा, म्हणजेच ते लोकांपर्यंत पोहचतील आणि तुम्हाला दागिन्यांचे ऑर्डर मिळेल. यातून तुम्ही व्यवसाय वाढवू शकता.