Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Call साठी आता कस्टम रिंगटोन सेट करता येणार; अशी आहे प्रक्रिया

Whats app customs ringtone

How to set custom ringtones for WhatsApp calls: व्हाट्सअँपचे भारतात जवळपास 2 अब्ज वापरकर्ते आहेत. नुकतेच व्हाट्सअँपने इनकमिंग कॉल आणि मेसेजसाठी कस्टम रिंगटोन सेट करण्यासंदर्भात नवीन अपडेट उपलब्ध करून दिले आहे.

How to set custom ringtones for WhatsApp calls: व्हाट्सअँपचे भारतात जवळपास 2 अब्ज युजर्स आहेत. हल्ली या माध्यमातून अनेक कंपन्या आपल्या सेवा लोकांपर्यंत पुरवत आहेत. वाढता युजर्सवर्ग(Users) लक्षात घेऊन व्हाट्सअँपने(WhatsApp) देखील वेगवेगळे फीचर्स(Features) आणले आहेत, ज्याचा आनंद लोकांना घेता येत आहे. हे माध्यम मेटाच्या(Meta) मालकीचे असून यावर तुम्हाला इनकमिंग कॉल आणि मेसेजसाठी कस्टम रिंगटोन सेट(set custom ringtones) करण्याचे नवीन अपडेट समोर आले आहे. एकमेकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी कस्टम अलर्ट सेट केल्यामुळे एखाद्यास ते इतर कॉन्टॅक्टपासून वेगळे करता येते. पण जर तुम्ही एका ठराविक कॉन्टॅक्टसाठी(Personal Contact) म्हणजेच व्हाट्सअँप इनकमिंग कॉलसाठी कस्टम रिंगटोन सेट करण्याचा पर्याय शोधात असाल तर तो कसा मिळवायचा याबद्दल जाणून घेऊयात.

पर्सनल कॉन्टॅक्टसाठी अशी करा रिंगटोन सेट

  • तुमच्या स्मार्टफोनमधील व्हाट्सअँप ओपन करून चॅट्स(Chats) या टॅबवर क्लिक करा
  • आता तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्टसाठी कस्टम रिंगटोन सेट(Set Custom Ringtones) करणार आहेत त्यांना सिलेक्ट करा
  • त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करून त्याची प्रोफाईल सिलेक्ट(Profile Select) करा
  • त्यानंतर स्क्रोल करून कस्टम नोटिफिकेशनवर(Notification) क्लिक करा
  • ही स्टेप केल्यानंतर कस्टम नोटिफिकेशन बॉक्स(Custom Notification Box) चेक करा
  • ही प्रोसेस झाल्यावर कॉल नोटिफिकेशनच्या अंतर्गत रिंगटोनवर(Ringtone) क्लीक करा व तुमच्या आवडीची रिंगटोन सिलेक्ट करा
  • आता तुमच्या पर्सनल व्यक्तीचा व्हाट्सअँप कॉल आला की रिंगटोन एन्जॉय करा