Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dial 112: सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी आता डायल करा 112

Dial 112

Dial 112: महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्र येऊन सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे 11.5 लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या आहेत.

Dial 112: हल्ली आपण सगळेच सोशल मीडियाचा(Social Media) मोठ्या प्रमाणावर वापर करत आहोत. त्यामुळे यामाध्यमात देखील मोठ्या प्रमाणावर तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या अंतर्गत लोकांना व्हॉट्सअ‍ॅप(What's app), ट्विटर(Twitter), फेसबुक(Facebook), ईमेल(E-mail) यासारख्या सोशल माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचा समावेश करता येणार आहे. या प्रणालीचे लोकार्पण शनिवारी(14 जानेवारीला) राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(DCM. Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुण्यात पार पाडले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थे मधील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या परिषदेच्या सुरुवातीला या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस(Maharashtra Police) आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस(Mahindra Defense Services) यांनी एकत्र येऊन ही प्रणाली विकसित केली असून आतापर्यंत सुमारे 11.5 लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील सुमारे 2.50 लाख तक्रारी या महिलांशी संबंधित आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून सरासरी दररोज 19 हजारावर कॉल्स स्वीकारले जात असून 2800 तक्रारी निपटण्यात पोलिसांना यश येत आहे.  

तक्रारींचे निवारण होण्याचा वेग वाढणार

महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, एसओएस, फेसबुक, ई-मेल, सिटिझन मोबाईल अ‍ॅप, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप या सोशल माध्यमातून(Social Media) येणार्‍या तक्रारींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे जलदगतीने तक्रार निपटता येणे शक्य होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त होणार्‍या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी(Quick Response) प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितांना लगेच मदत मिळण्यास मदत होणार आहे.

ट्विटर आणि फेसबुकवर '112 महाराष्ट्र' या नावाने अकाउंट

लोकांसाठी '112 महाराष्ट्र' या नावाने ट्विटर(Facebook) व फेसबुक(Facebook) हॅण्डल्सवर अकाउंट तयार केले असून, अन्य माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे या माध्यमातून लोकांना आपली तक्रार नोंदवून, तातडीने पोलिसांची मदत घेता येणार आहे. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची भर पडणार आहे.