Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

money saving tips on home loan: गृहकर्ज घेताय? पैसे कसे वाचतील घ्या जाणून..

money saving tips on home loan

money saving tips on home loan: स्वत:चे घर घ्यावे असावे असे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. बचत करावी लागते. सोबतच घर घेताना बहुतेकदा कर्जही घ्यावे लागते. होम लोन (गृह कर्ज) घेत असताना काही निर्णय घ्यावे लागतात, जे तुम्हाला खर्चात टाकू शकतात किवा यामुळे तुमची पैशाची बचत होऊ शकते. होम लोन घेताना पैशाची बचत करणाऱ्या या टिप्स जाणून घ्या.

स्वत:चे घर घ्यावे असावे असे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. बचत करावी लागते. सोबतच घर घेताना बहुतेकदा कर्जही  घ्यावे लागते. होम लोन (गृह कर्ज) घेत असताना काही निर्णय घ्यावे लागतात, जे तुम्हाला खर्चात टाकू शकतात किवा यामुळे तुमची पैशाची बचत होऊ शकते. होम लोन घेताना पैशाची बचत करणाऱ्या या टिप्स जाणून घ्या.  

प्री इएमआय घेणे टाळा (Avoid taking Pre EMI on home loan)

गृह कर्ज घेताना प्री इएमआय अशी एक आकर्षक ऑफर समोर येते. याद्वारे मालमत्तेचा ताबा मिळेपर्यंत कमी इएमआय ( Equated Monthly Instalment) द्यावा लागतो. मात्र यात मूळ रक्कम फेडली जात नाही. कर्जदार फक्त कर्जावर व्याज देत राहतो. यामुळे हे टाळणे चांगले मानले जाते.

आपले गृह कर्ज निश्चित व्याजदराचे नसते, त्यावेळी कर्ज घेणाऱ्याने विशेष दक्ष राहणे आवश्यक आहे. आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) प्रत्येक वेळी धोरण बदलते त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे  आहे. कारण, त्यामुळे, तुमच्या कर्जावरील व्याजदर दरवर्षी काही वेळा बदलू शकतात. यावेळी बँकेने EMI बदलला असेल किवा इएमयाय समान ठेऊन कर्जाचा कालावधी बदलला असेल, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

दर तीन महिन्यांनी आढावा घ्या

यासाठी दर तीन महिन्यांनी तुमच्या गृहकर्जाचा आढावा घ्या. तुमचा EMI बदलला आहे का?,  तुमचा व्याजदर बदलला आहे का?, तुमच्या कर्जाचा कालावधी बदलला आहे का? या दृष्टीने आढावा घ्या.

सुरुवातीच्या काळात गृहकर्ज घेताना घरातील खर्च विचारात घेऊन EMI ठरवला असेल. काही कालावधीनंतर तुमचा पगार वाढेल, किवा अन्य मार्गाने पैसे मिळतील. अशावेळी तुम्हाला तुमच्या कर्जासाठी प्रीपेमेंट करण्याच्या संधी मिळेल. ती गमावू नये. आणि तुम्ही प्री-पे करताना प्रत्येक वेळी  कर्जाचा कालावधी कमी करण्यास सांगा.

‘ईएमआय’ कमी करण्यापेक्षा कर्जाचा कालावधी कमी करा

इएमआय कमी करण्याची इच्छा होऊ शकते. यामुळे हातात दरमहा अधिक पैसे राहू शकतील. पण हा पर्याय तितकासा चांगला नाही. दीर्घ कर्ज म्हणजे जास्त व्याज खर्च. कर्जाचा कालावधी कमी केल्यास व्याजाचा खर्च कमी होईल.

काही वर्षापूर्वीपर्यंत गृह कर्ज घेणे तुलनेने सोपे होते. मात्र व्याजदर वाढल्याने गृहकर्ज घेणाऱ्याचा आर्थिक भार वाढला आहे. अशा वेळी हे लोन घेताना पैसे वाचवणे अधिक महत्वाचे ठरते. प्रत्येक कर्ज घेणाऱ्याने स्वत:च्या गरजा आणि कर्ज परत फेडीची रचना याचा बारकाईने तपशील सामजून घेऊन स्वत:चा निर्णय घेणे योग्य राहते.