Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 15 Pre-order: आयफोन 15 प्री-ऑर्डर कसा करायचा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

How to pre order iPhone 15

Image Source : www.twitter.com/theapplehub

आयफोन प्रेमींना आज (शुक्रवार) सायंकाळी 5:30 PM पासून iPhone 15 ची आगाऊ बुकिंग करता येईल. चार नवीन मॉडेलपैकी तुमचा आवडता मोबाइल अ‍ॅपल इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑर्डर करता येईल. अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून आयफोन कसा बुक करायचा जाणून घ्या.

iPhone 15 Booking: अ‍ॅपल कंपनीने iPhone 15 मोबाइल सिरिज 12 सप्टेंबरला जगभरात लाँच केली. तेव्हापासून आयफोन चाहत्यांना मोबाइलची उत्सुकता लागली आहे. आज (शुक्रवार) सायंकाळी 5:30 वाजेपासून प्री ऑर्डर करता येईल. तर 22 सप्टेंबरपासून मोबाइल बाजारात उपलब्ध होईल.

iPhone सिरिजमधील चार मोबाइल कंपनीने लाँच केले. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 pro आणि iPhone 15 pro max या चार मोबाइलचा समावेश आहे. (How to order apple 15) डिझाइन, प्रोसेसर, कॅमेरा आणि इतर फिचर्समध्ये हे चारही फोन आधीच्या मोबाइलपेक्षा सरस आहेत. मोबाइलचे अनावरण केल्यानंतर अ‍ॅपल शोरुममध्ये विचारणा सुरू झाली आहे.  

आयफोन 15 ऑनलाइन कसा ऑर्डर कराल?

अ‍ॅपलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन "Shop iPhone" हा पर्याय निवडा. या लिंकवरून iPhone ऑर्डर करता येईल. 

आयफोन 15 मधील विविध पर्याय दिसतील. (apple 15 booking process) तुमच्या पसंतीचा मोबाइल निवडा. मोबाइलचा रंग आणि स्टोरेज क्षमता निवडता येईल. 

तुमचा जुना मोबाइल विकून नवा घ्यायचा आहे का हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. 

AppleCare+ विम्याचे संरक्षण पाहिजे असेल तर तसा पर्याय सिलेक्ट करावा लागेल.

डिलिव्हरीसाठी तुमचे नाव, पत्ता आणि ऑर्डर कशी स्वीकारायची याची माहिती द्यावी लागेल.

ऑनलाइन पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाइल बुक होईल. ऑर्डर यशस्वी झाल्याचा मेल मिळेल. 

how-much-does-iphone-15-cost-in-india-table-no-1.png

इतर देशांच्या तुलनेत भारतीयांसाठी iPhone 15 महाग

अ‍ॅपल iPhone चे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होते. मात्र, भारतातही आता फोनची निर्मिती आणि अ‍ॅसेम्बली सुरू झाली आहे. (How to pre book apple 15)  कंपनीने नव्याने लाँच केलेला iPhone 15 मेड इन इंडिया आहे. दरम्यान, मेड इन इंडिया आयफोन भारतीयांसाठी इतर देशांच्या तुलनेत महाग ठरत आहे. दुबईतील किंमतीपेक्षा भारतातील आयफोन 15 ची किंमत 52 टक्क्यांनी जास्त आहे.