Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 15 Launch: आयफोन 15 सिरिज लाँच; अफलातून फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

iPhone 15 price in india

Image Source : www.twitter.com/Apple

iPhone 15 सिरिजमधील 4 मोबाइल फोन्स आणि Series 9 आणि Ultra 2 हे दोन स्मार्ट वॉच कंपनीने लाँच केले. हाय स्पीड प्रोसेसर, आर्टिफिशियल इंटिलिजिन्सचा वापर, पावरफुल्ल प्रोसेसर, कॅमेरा फिचर आणि डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.

iPhone 15 Launch: जगभरातील अ‍ॅपल उत्पादनांचे चाहते मागील काही दिवसांपासून iPhone 15 सिरिजची वाट पाहत होते. काल (मंगळवार) रात्री भारतीय वेळेनुसार 10:30 वाजता कंपनीने नव्या उत्पादनांचे अनावरण केले. 15 सप्टेंबरला सायंकाळी 5:30 पासून आगाऊ बुकिंग करता येईल. तर 22 सप्टेंबरला दुकानात नवीन मॉडेल उपलब्ध होतील.

iPhone 15 सिरिजमधील 4 मोबाइल फोन्स आणि अ‍ॅपल वॉच Series 9 आणि Ultra 2 या दोन नव्या स्मार्ट वॉचचे अनावरण केले. हाय स्पीड प्रोसेसर, आर्टिफिशियल इंटिलिजिन्स, आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक ब्राइट डिस्प्लेसह अनेक हायटेक फिचर्स देण्यात आली आहेत. अ‍ॅपलची उत्पादने पर्यावरण पूरक करण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. स्मार्ट वॉच आणि मोबाइल तयार करण्यासाठी प्रक्रिया केलेला कच्चा माल वापरण्यात आला आहे.  

आयफोन 15 सिरिज लाँच (iPhone 15 Launch)

iPhone 15 आणि iPhone 15 Plus असे दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही मॉडेलमधील फिचर्स सारखे असून फक्त Plus मॉडेलमध्ये 6.7 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर iPhone 15 मध्ये 6,1 इंच डिस्प्ले आहे.

नवीन फिचर्स कोणते?

मागील वर्षी 14 pro मॉडेलमध्ये जे डायनामिक आयलँड फिचर देण्यात आले होते. त्याचा समावेश 15 सिरिजमध्ये करण्यात आला आहे. याद्वारे मोबाइलमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी आणि अलर्ट होम स्क्रिनवरून पाहता येतील.

प्रायमरी कॅमेरा 12 MP वरून 48MP करण्यात आला आहे. 

Super Retina XDR डिस्प्ले

क्वाड पिक्सल सेन्सर आणि 100 टक्के फोकस पिक्सल, 2x Telephoto झूम फिचर देण्यात आले आहे. 

हाय स्पीडसाठी A16 Bionic चीप देण्यात आली आहे. तसेच iOS 17 ऑपरेटिंग सिस्टिम आहे. 

नव्या मॉडेलमध्ये लाइटनिंग केबलऐवजी सी टाइप केबल देण्यात आली आहे. 

आयफोन 15 ची भारतातील किंमत किती? (iPhone 15 and iPhone 15 Plus price in India) 

दोन्ही मोबाइल गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळ्या रंगात उपलब्ध असतील. 128GB, 215GB आणि 512GB स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत. iPhone 15 ची किंमत 79900 रुपये आणि iPhone 15 Plus ची किंमत 89900 रुपये आहे.

आयफोन 15 प्रो सिरिज लाँच (iPhone 15 Launch Wonderlust event)

iPhone 15 pro आणि iPhone 15 pro max अशी आणखी दोन मॉडेल प्रो सिरिजमध्ये लाँच करण्यात आली आहेत. iPhone 15 पेक्षा अधिक शक्तिशाली प्रोसेसर, डिझाइन, कॅमेरा फिचर्स या सिरिजमध्ये देण्यात आले आहेत.

प्रो सिरिजमधील मोबाइलची बॉडी टायटॅनियम धातूपासून बनवण्यात आली आहे. यापूर्वीच्या मॉडेलमध्ये स्टेनलेस स्टील वापरण्यात येत होते. टायटॅनियम धातूमुळे मोबाइलचे वजन 10 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

15 Pro Max मध्ये 5x-6x ऑप्टिकल झूम periscope lens लेन्स देण्यात आली आहे. 

रिंग आणि सायलेंटसाठीचे बटन बदलून त्याऐवजी अ‍ॅक्शन बटन देण्यात आले आहे. हे बटन विविध गोष्टींसाठी कस्टमाइझ करता येईल. म्हणजे, कॅमरा, म्युझिक, टार्च, मेल किंवा इतर गोष्टी ओपन करण्याकरिता वापरता येईल. 

प्रो सिरिजमध्ये A17 Pro 3 नॅनोमीटर चीप देण्यात आली आहे. 

48MP मेन कॅमेरा, 3x टेलिफोटो कॅमेरा, अ‍ॅडव्हान्स्ड स्टॅबिलाइझेशन देण्यात आले आहे. 

iPhone प्रो सिरिजची मोबाइल किंमत (iPhone Pro series price)

iPhone Pro मोबाइलची किंमत 134900 पासून पुढे सुरू आहे. तर iPhone pro Max ची किंमत 159900 पासून पुढे सुरू आहे. 128GB, 256GB, 512GB, आणि 1TB स्टोरेजचे पर्याय उपलब्ध आहेत. 

अ‍ॅपल वॉच Series 9 आणि Ultra 2 लाँच (Apple Series 9 and Ultra 2 smart watch price)

अ‍ॅपल कंपनीने Series 9 आणि Ultra 2 या दोन नव्या स्मार्ट वॉचचे अनावरण केले. दोन्ही वॉचमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स, पावरफुल डिस्प्ले, आकर्षक डिझाइन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. अ‍ॅपल वॉच Series 9 ची किंमत 41,900 रुपयांपासून पुढे आहे. तर Ultra 2 स्मार्ट वॉचची किंमत 90 हजार रुपयांपासून पुढे आहे. 

डबल टॅप फिचर

पहिल्यांदाच बोटांद्वारे टबल टॅप फिचरचा वापर करण्यात आला आहे. अंगठा आणि तर्जनी दोनदा टॅप केल्यास फोन रिसिव्ह/रिजेक्ट करता येईल. तसेच अ‍ॅक्टिव्हिटी लॉग, आणि इतर मेन्यूसुद्धा डबल टॅप फिचरद्वारे वापरता येतील. पुढील आठवड्यात दोन्ही वॉच उपलब्ध होतील.